Birthday SPL : वयाच्या 28 व्या वर्षी साकारला होता 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा ‘रोल’, हॉलिवूडमध्येही केलाय ‘धमाका’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आपला 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनुपम खेर असे अभिनेते आहेत ज्यांनी सिनेमात येताच 60 वर्षांच्या म्हाताऱ्याचा रोल साकारला होता. अनुपम यांनी आतापर्यंत 500 सिनेमात काम केलं आहे. फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही त्यांनी आपलं नशीब आजमावलं आहे. त्यांच्याबद्दल आज आपण काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

यादगार सिनेमे-

अनुपम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर एका काळात त्यांना कॉमेडी किंग म्हटलं जायचं. त्यांनी अनेक गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. कुछ कुछ होता है पासून तर दिलवाले दुन्हनिया ले जाएंगे पर्यंत आणि अ वेडनेस्डे पासून तर स्पेशल 26 पर्यंत प्रेक्षकांवर त्यांनी आपली छाड सोडली आहे. कुछ कुछ होता है या सिनेमातील त्यांनी साकारलेला मिस्टर मल्होत्राचा रोल लोकांना आजही आठवतो.

https://www.instagram.com/p/BbDoELpAvYu/

अशी केली सुरुवात

थिएटरमध्ये नाटक करत अनुपम खेर यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांच्या पहिल्या सिनेमाचं नाव आहे आगमन. हा सिनेमा 1982 साली आला होता. याच सिनेमात त्यांनी एका 60 वर्षांच्या म्हाताऱ्याचा रोल केला होता. त्यावेळी ते केवळ 28 वर्षांचे होते. त्यांनी टीव्हीवर द अनुपम खेर शो मध्ये काम करत खूप अटेंशन घेतलं आहे.

https://www.instagram.com/p/B1qNlphB0XU/

इथं साजरा केला जातो अनुपम खेर डे

एक असं ठिकाण आहे जिथे द अनुपम खेर डे साजरा केला जातो. नेवादाच्या सिनेटर रुबेन खियुननं ह्युस्टनमध्ये सर्टिफिकेट ऑफ एक्सिलेंस देत अनुपम खेर यांच्या सिनेमातील योगदानाचं कौतुक करत त्यांची स्तुती केली होती. त्यानं सांगितलं की, तुमच्या कामाचं आम्ही कौतुक करतो. आजपासून लॉस वेगासमध्ये 10 सप्टेंबर रोजी अनुपम खेर दिवस साजरा केला जाईल. अनुपम खेर यांनीही त्याचे आभार मानले होते.

मिळाला आहेत सन्मान

अनुपम खेर यांना आपल्या दमदार अभिनयासाठी पद्म भूषण आणि पद्म श्री यांसारखे पुरस्कारही मिळाले आहेत.

किरण खेर सोबत केलं लग्न

अनुपम खरे यांचं एक लग्न झालं आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं मधुमालती. किरण खेर अनुपम यांची दुसरी पत्नी आहे. मधुमालती आणि अनुपम 1985 मध्ये आपापसातील सहमतीनं वेगळे झाले होते. किरण खेर देखील आधी विवाहित होती. तिच्या पतीचं नाव आहे गौतम बेरी. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगाही आहे. त्याचं नाव आहे सिकंदर