… म्हणून कोणत्याही सुपरस्टारचा सिनेमा ‘हिट’ होईलच याची गॅरंटी नाही

मुंबई : वृत्तसंस्था – ‘फिल्म द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपटानंतर आता अभिनेता अनुपम खेर आपला आगामी चित्रपट ‘वन डे: जस्टिस डिलीवर्ड’ च्या प्रदर्शनाच्या तयारीमध्ये आहे. अभिनेता अनुपम यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीत ३३ वर्षे पुर्ण केले आहे. एका वृत्तपत्रामध्ये अनुपम खेर यांनी खास चर्चा केली. त्यांनी चित्रपटांमध्ये कसा बदल झाला व अनुपम यांना काही प्रश्न विचारले गेले त्यांचे उत्तर त्यांनी कशाप्रकारे दिले ते जाणून घेऊया.

३५ वर्षामध्ये चित्रपटांमध्ये किती बदल झाला ?

अनुपम याबद्दल म्हणाले की, समाज बदलला आहे. जग बदलले आहे त्यामुळे चित्रपटांमध्ये देखील बदल झाला आहे. पहिले नाते मजबूत आणि मैत्रीसुद्धा घट्ट होती. आजच्यासारखे लोक असे दिवस-रात्र मोबाईलमध्ये व्यस्त नव्हते. शूटिंग पुर्ण झाल्यानंतर आम्ही सगळे झाडाखाली बसून गप्पा मारायचो. बदलामुळे माणूस आपली निर्दोषता गमावत आहे.

राष्ट्रवादामुळे सिनेमावर काय परिणाम होतो ?

राष्ट्रवाद सिनेमामध्ये पहिल्यापासून होता. पण जेव्हा काही लोकांना राष्ट्रहिताच्या इतर गोष्टींबद्दल प्रतिक्रिया चित्रपटांमध्ये दिसली. जसे की, शहीद, उपकार, कर्मा हे सगळे राष्ट्रवाद चित्रपट आहे. पहिले सगळे राष्ट्रवाद होते पण आता काही लोक असे आहेत जे म्हणतात, राष्ट्रवाद होणे गरजेचे आहे का ?

नरेंद्र मोदीच्या चित्रपटाच्या विजयावर तुम्ही काय म्हणाल ? तुम्ही तर शपथविधीच्या समारोपाला पण उपस्थित होते ?
सगळ्या जनतेने मिळून एका नेत्याची निवड केली आहे. हे सगळे जनतेवर असते. हा जनतेचा निर्णय आहे.

 

सिकंदर खेर सध्या चांगले काम करत आहे का ? की प्रेक्षकांना हे पाहण्यास उशीर झाला ?

मला वाटते की, त्याला येण्यास उशीर झाला आहे. त्यांने लवकरच यायला पाहिजे होते. तो एक चांगला अभिनेता आहे. मी असे म्हणतो याचे कारण हे नाही की तो माझा मुलगा आहे. मी स्वतः अभिनयाचा शिक्षक आहे आणि एका शिक्षकाच्या दृष्टीकोणातून पाहिले तर तो एक चांगला कलाकार आहे. मला आनंद आहे की, लोक त्याला ओळखू लागले आहे. ‘रॉ’ मध्ये त्याने खूप चांगले काम केले आहे. अशी अपेक्षा करतो की ‘सूर्यवंशी’ मध्ये ही तो चांगले काम करेल.

आता तुम्ही ‘वन डे: जस्टिस डेलिवर्ड’ चित्रपट करत आहात, असे चित्रपट आपल्यासारख्या कलाकारांना किती महत्वाचे आहे ?

मी त्या कलाकारांमधील आहे जो प्रत्येक नवीन चित्रपटांना साथ देतो. मी पहिले डायरेक्टरसोबत काम करण्यास तयार असतो. आज अशी वेळ आहे की, तुम्ही कमी बजेटशिवाय मोठ्या कलाकारांचे चित्रपट करु शकता. आजच्या काळामध्ये चित्रपट प्रसिद्ध होण्याची गॅरेंटी नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

‘मदरहूड हॉस्पिटल आणि स्फेरुल फाउंडेशन’ला ‘गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रमाणपत्र

केवळ चवीसाठीच नाही तर, विविध आजारांसाठीही गुणकारी आहे ‘पुदिना’

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स