2 वेळा घटस्फोट झाल्यानंतर ‘या’ स्टारचं 22 वर्षाच्या मुलीशी ‘झेंगाट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – असे म्हणतात की, प्रेमासाठी कोणतेही वय नाही आणि आयुष्यात प्रेम शोधण्यासाठी कोणतीच योग्य वेळ नाही …असेच काहीसे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या वैयक्तिक जीवनात पहायला मिळत आहे. अनुराग कश्यप आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करीत आहेत आणि यानिमित्ताने आम्ही आपल्याला त्याच्या लव्ह लाइफशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत.

अनुराग कश्यपचे दोन विवाह झाले आहेत आणि दोन्हीही नाते जास्त काळ टिकू शकले नाही. तेव्हापासून अनुराग बर्‍याच दिवसांपासून एका 22 वर्षीय मुलीला डेट करत आहे.Anurag-Khayap

गोरखपूरमध्ये राहणारा अनुराग कश्यप चित्रपट निर्माता म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या चित्रपटांसोबतच अनुराग त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत आहे. अनुराग कश्यप गेल्या काही काळापासून शुभ्रा शेट्टी नावाच्या मुलीला डेट करत आहे. शुभ्रा शेट्टीचे वय 22 वर्षे असल्याचे सांगितले जाते. अनुराग कश्यपने हे नाते काही काळ सोशल मीडियापासून लपवून ठेवले होते, पण एका मुलाखतीत आणि सोशल मीडियावरील फोटोंच्या माध्यमातून त्यांनी स्वत: आपले प्रेम जाहीर केले.

एका मुलाखती दरम्यान अनुरागने त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, ‘प्रत्येकाला प्रेम करण्याचा हक्क आहे. मला प्रेमाची खूप किंमत आहे मग त्यामध्ये वय कितीही असो. मला वेळ वाया घालवायचा नाही. तुटलेल्या हृदयाऐवजी पुन्हा प्रेमात पडण्यावर माझा विश्वास आहे ‘. असं म्हणतात की, अनुराग कश्यप आणि शुभ्रा शेट्टी यांचे नाते खूप चांगले आहे. अनुराग कश्यप अनेकदा शुभ्राबरोबर सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसतो.

अनुराग कश्यपचे पहिले लग्न 2003 मध्ये आरती बजाजशी झाले होते. 2009 मध्ये आरती बजाजबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर त्याने बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन हीच्याशी लग्न केले. 2011 मध्ये अनुराग आणि कल्कीचे लग्न झाले आणि 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोन विवाह तुटल्यानंतर अनुराग कश्यपने अद्याप तिसरे लग्न केले नाही, परंतु तो शुभ्रा शेट्टीला बऱ्याच काळापासून डेट करत आहे. आता या दोघांचे लग्न केव्हा होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.