Anusha Dandekar On Karan Kundra: ‘अनुषा दांडेकर’नं एक्स-बॉयफ्रेंड ‘करण कुंद्रा’वर खोटे बोलल्याचा आणि फसवणूकीचा केला ‘आरोप’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अभिनेत्री अनुषा दांडेकरने एक्स बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत झालेल्या ब्रेकअपवर भाष्य केले असून तिने एक नोट शेअर करत लिहिले की करण कुंद्राने तिला फसवले आहे आणि तिच्याशी खोटे बोलले आहे. यामुळे तिच्या स्वाभिमानालाही ठेस पोहोचली आहे. टीव्ही कलाकार आणि व्हीजे अनुषा दांडेकर गेल्या काही काळापासून ब्रेकअपच्या बातमीला नकार देत होती पण आता अनुषाने म्हटले आहे की करण तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये फसवणूक करत आहे.

2020 च्या शेवटी अनुषाने इन्स्टाग्रामवर एक लांब नोट शेअर केली आहे. त्यात तिने एका लेखकाचा कोट शेअर केला आहे आणि असे लिहिले आहे की प्रेम ही एक लढाई नसते. अनुषाने पुढे असेही लिहिले आहे की तिने एका रिलेशनशिपमध्ये स्वत:ला आणि स्वत:चा आत्मसन्मान देखील गमावला आहे.

अनुषा म्हणाली, ‘हे वर्ष संपण्यापूर्वी मला सांगायचे आहे की हो मी ‘लव्ह स्कूल’ नावाचा एक शो होस्ट केला होता. मी तुमची लव्ह प्रोफेसर होती. मी तुम्हाला जो काही सल्ला दिला तो मनापासून दिला. मी मनापासून प्रेम केले होते. मी तोपर्यंत सोडून जात नाही जोपर्यंत मनात काहीही शिल्लक राहत नाही. होय, मी एक माणूस आहे. मी एका रिलेशनशिपमध्ये स्वत:ला आणि स्वतःचा आत्मविश्वास गमावला आहे. माझ्याशी खोटे बोलले गेले आणि फसवले गेले. मला क्षमाची देखील अपेक्षा होती पण ती कधीही मागण्यात आली नाही. तेव्हा मला समजले की मला स्वतःची माफी मागावी लागेल आणि स्वतःला माफ करावे लागेल. या संबंधातून मी बरेच काही शिकले आहे आणि आता मी सकारात्मक पैलूकडे पावलं टाकत आहे.’

https://www.instagram.com/p/B8i1OSlByke/?utm_source=ig_embed

अनुषाने असे देखील म्हटले की, ‘तुम्ही माझ्यावर खुल्या मनाने प्रेम केले आहे. आता माझ्यावर इतके प्रेम करा की मी पुन्हा प्रेमात पडेल, माझा एक शेवटचा सल्ला आहे की प्रेम करा पण इतकेही करू नका की ज्यामुळे तुम्हाला दुःख होईल. माझी प्रेमकथा आता स्वतःपासून सुरु होते.’ अनुषाची बहीण शिबानीने या पोस्टवर लिहिले आहे की, ‘माझे हृदय तुझ्याबरोबर आहे.’