…म्हणून विराटशी लग्न करण्यासाठी अनुष्काने दिला होता ‘नकार’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतीय संघाचा तडाखेबाज बॅट्समन विराट कोहली याच्याशी लग्न करण्यास अनुष्का शर्माने नकार दिला होता. एकमेकांना डेट करत असताना दोघांनी 2015 मध्ये ब्रेकअप केला होता. इतकेच नाही तर त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलोही केले होते. विराटला 2015 मध्येच लग्न करायचे होते. मात्रा, अनुष्काला करियरवर लक्ष द्यायचे होते. त्यामुळे तिने लग्नाला नकार दिला असल्याचे म्हटले आहे.

चित्रपटातून कलाविश्वात ‘रब ने बना दी जोडी’मधून पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. निखळ हास्य आणि उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर अनुष्काने कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्री क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधलीया दोघांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे या दोघांची लग्नाची जितकी चर्चा रंगली तितकीच त्यांच्या अफेअर्सचीही रंगली होती.

दोघांनी लग्न करण्यापूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. विराट आणि अनुष्काने डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले होते. विराटला अनुष्कासोबत 2015 मध्येच लग्न करायचे होते. त्यावेळी अनुष्काला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. त्यामुळे तिने विराटच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. याचकारणास्तव या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांनी एकमेकांशी बोलणे बंद केले होते. तसेच सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोदेखील केले होते. त्यांच्यातील हा वाद फार काळ टिकला नाही. ते एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याची जाणीवर दोघांना 11 डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले.