अनुष्कानं शर्मानं सांगितले सर्व ‘सिक्रेट्स’, LIVE VIDEO मध्ये चकित झाला विराट, म्हणाला – सर्वच सांगितलं ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि भारतीय फुटबॉल टीमचा कॅप्टन सुनील छेत्री यांनी नुकतंच एक लाईव्ह सेशन केलं. छेत्री इंस्टावर इलेवनऑनटेन शो मध्ये होस्टची भूमिका साकारत होता. 28 मिनिट त्यांची बातचित सुरू होती. पूर्ण बातचित पाहिल्यानंतर तुम्हीही खूप हसाल.

छेत्री विराटला म्हणाला की, तू अनुष्काचं शुट पाहण्यासाठी आणि तिला सपोर्ट करण्यासाठी लंडन आणि प्रागला गेला होता. 5 मिनिट शुट पाहिल्यानंतर तू ओल्ड ट्रक रेस्टॉरंटमध्ये जाऊन झोपला. ती तुझी पूर्ण मॅच पहाते आणि तू 5 मिनिटातच झोपलास.

हे ऐकल्यानंतर विराटनंही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. विराटनं जेट लेगचं कारण सांगितलं ज्यामुळं त्याला झोप आली होती. विराट बोलत असताना मध्येच अनुष्का म्हणते खोटारडा. हे ऐकल्यानंतर छेत्री खूप हसतो.

त्या दिवसाची आठवण काढत विराटनं सांगितलं की, तो हॉटेलमध्ये झोपण्यासाठी नव्हता गेला. तर तो तिथेच एका व्हॅनमध्ये झोपला होता जी शुटींगच्या ठिाकणी थांबली होती. तो म्हणतो की, मी हे अनुष्काला सांगण्यासाठी एकाकडे निरोप दिला होता परंतु तो माणूनस सांगायचं विसरला.