आई झाल्यानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट, टीम इंडियासाठी लिहिला खास मॅसेज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलीवुड अभिनेत्री आणि प्रोड्यूसर अनुष्का शर्मा नुकतीच आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर ती सोशल मीडियापासून दूर होती, परंतु आई झाल्यानंतर सुमारे 10 दिवसानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे, जी खुप वायरल होत आहे. मंगळवारी भारतीय क्रिकेट टीमने जेव्हा आस्ट्रेलियाला गाबामध्ये त्यांच्याच मातीत चित केले, तेव्हा अनुष्का आपल्या फिलिंग्स शेयर करण्यापासून स्वत:ला थांबवू शकली नाही. तिने गाबा टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमच्या ऐतिहासिक विजयासाठी अभिनंदन केले.

Anushka Sharma, Anushka Sharma's return to social media, Bollywood, Indian cricket team, Border-Gavaskar Trophy, Australia, India, News18, अनुष्का शर्मा, अनुष्का शर्मा की सोशल मीडिया पर वापसी, बॉलीवुड, भारतीय क्रिकेट टीम, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, आस्ट्रेलिया, भारत, न्यूज18

आई झाल्यानंतर पहिल्यांदा अनुष्का शर्माने इंस्टाग्राम स्टोरीवर टीमचा एक फोटो शेयर करू लिहिले, काय विजय आहे टीम इंडिया, वाह! येणार्‍या अनेक वर्षांसाठी प्रेरणा आहे हा विजय.

भारतीय टीमच्या या ऐतिहासिक विजयावर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, बॉबी देओल आणि सन्नी देओल सारख्या अनेक बॉलीवुड कलाकारांनी आपल्या स्टाइलमध्ये अभिनंदन केले आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, इंडिया इंडिया.. ठोकले ऑस्ट्रेलियाला. टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा.

बॉलीवुडचा बादशाह शाहरुख खानने ट्विट केले आहे की, काय शानदार विजय आहे आपल्या टीमसाठी. रात्रभर बसून मॅच पाहिली आहे आणि आता मी शांतपणे झोपणार आहे. चक दे इंडिया.