कार्यक्रमात भावूक झाला विराट कोहली, पत्नी अनुष्कानं ‘KISS’ करून सावरलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी या कार्यक्रमात विराट कोहली थोडा भावुक झालेला पाहायला मिळाला. यावेळी अनुष्का शर्मा त्याला सावरताना दिसून आली. नुकताच दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियमच्या नामांतरणाचा सोहळा पार पडला. यावेळी या कार्यक्रमात कोहली भावुक झालेला पाहायला मिळाला.

दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानाचे नाव बदलून माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे नाव या मैदानाला देण्यात आले आहे. त्यावेळेची झालेल्या कार्यक्रमासाठी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दिल्लीला आले होते. त्याचबरोबर भारतीय संघातील अनेक खेळाडू यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  यामध्ये अनुष्का शर्मा आपला पती विराट कोहली याच्या हातावर किस करताना दिसून येत आहे. या कार्यक्रमात मैदानाच्या नामकरणाबरोबरच या मैदानातील एका स्टँडला विराट कोहली याचे देखील नाव देण्यात आले आहे. त्यावेळी दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी एक घटना सांगितली. रजत शर्मा यांनी सांगितले कि, विराट कोहली याच्या वडिलांच्या निधनानंतर अरुण जेटली त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी विराट कोहली अंडर-19 संघात खेळत होता. त्यावेळी त्याने वडिलांच्या निधनानंतर देखील उत्तम खेळी साकारून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर विराट कोहली याचे जेटलींनी कौतुक केले होते आणि हा खूप नाव कमावेल असे म्हटले होते. त्यामुळे रजत शर्मा यांची ती गोष्ट ऐकून विराटाचे डोळे पाणावले. त्यामुळे भावुक झालेल्या विराटला अनुष्का सांभाळताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत विजय मिळवून आपला फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न विराट ब्रिगेड करणार आहे.

You might also like