अनुष्का शर्मानं मुलीच्या नावाच्या घोषणेनंतर शेअर केली ‘खास’ पोस्ट ! लिहिला ‘हा’ मेसेज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती व टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) नुकतेच आईबाबा झाले आहेत. अनुष्कानं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सर्वांना विरुष्काच्या मुलीच्या नावाबद्दल उत्सुकता होती. सोमवारी (दि 1 फेब्रुवारी 2021 रोजी) अनुष्कानं मुलीचा पहिला फोटो शेअर करत तिचं नाव जाहीर केलं आहे. तिनं मुलीचं नाव वामिका ठेवलं आहे. आता मुलीच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता अनुष्कानं आणकी एक पोस्ट शेअर केली आहे.

अनुष्कानं तिच्या इंस्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. यात दिसत आहे की, पांढऱ्या रंगाचा घोडा आहे आणि त्याच्या समोर एक मुलगा बसला आहे. अनुष्काची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. यात तिनं असंही लिहिलं की, तुम्ही देखील एखाद्या दुसऱ्या अशा व्यक्तीला भेटला आहात ज्यांनी आपल्या आयुष्यात खूप स्ट्रगल केला आहे. मी आजवर अशा व्यक्तीला नाही भेटले ज्यानं मेहनत केली नसेल.

अनुष्काची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनुष्काच्या या पोस्टवर अनेकांनी अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही पोस्ट शेअर देखील केली आहे.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. याशिवाय तिनं प्रोड्युस केलेला बुलबुल हा सिनेमाही नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे ज्याला चाहत्यांचं भरपूर प्रेम मिळालं. ॲक्टींगबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहे. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.