हातात हात घालून फिरताना दिसले ‘मलायका-अर्जुन’ व्हिडीओ व्हायरल !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आपल्या फोटोंव्यतिरीक्त अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळंही चर्चेत असते. दोघांचं नातं बी टाऊमध्ये टॉकिंग पॉईंट झालं आहे. जेव्हा कधी मलायका आणि अर्जुन एकत्र दिसत असतात त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे. मलायका अर्जुनचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात दोघं एकत्र दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B9sOwXNBEon/?utm_source=ig_embed

समोर आलेल्या फोटोत आणि व्हिडीओत दिसतंय की, मलायका बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत हातात हात घालून फिरत आहे. व्हिडीओत दिसतंय की, अर्जुननं मलायकाचा हात धरला आहे आणि तिच्यासोबत चालत आहे.

चाहत्यांना मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांची रोमँटीक केमिस्ट्री खूप आवडते. चाहत्यांना त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. काहींनी कमेंट करत त्यांना लग्नाबद्दल विचारणा केली आहे. काहींनी त्यांच्या प्रेमांच कौतुक केलं आहे. काही चाहत्यांनीच त्यांना लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी मलायकाच्या लुकबद्दल तिचं कौतुक केलं आहे.

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच तो पानीपत सिनेमात दिसला होता. हा एक पीरियड ड्रामा होता. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ठिकठाक कमाई केली. यानंतर आता लवकरच तो संदीप और पिंकी फरार या सिनेमात दिसणार आहे. 20 मार्च 2020 रोजी हा सिनेम रिलीज होणार आहे.