आईची आठवण काढत भावुक झाला अर्जुन कपूर ! शेअर केली पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यानं त्याची दिवंगत आई मोना कपूर (Mona Kapoor) यांची आठवण काढत एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. आपल्या आईच्या संघर्षाची आठवण काढत अर्जुननं जपानी फिलॉसॉफर डेसाकू इकेदा (Daisaku Ikeda) यांची एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यानं आईच्या प्रेमाची पवित्रता आणि मूल्यांबद्दल सांगितलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये अर्जुन लिहितो, आपल्या आईनं केलेल्या प्रेमाला आणि संघर्षाला कधीच विसरू नका. तुमच्यासाठी तिनं जे काही केलं तेही कधी विसरू नका. जी लोकं आपल्या डोक्यात आईची सुंदर प्रतिमा ठेवतात ते कुठेही जात नाही. आपण सर्व आनंद आणि शांतीच्या मार्गावर सोबत चालूयात असंही तो म्हणाला आहे.

अर्जुनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. इंडस्ट्रीतील त्याचे अनेक मित्रही यावर कमेंट करत आहेत. यासोबतच चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या त्याची ही पोस्ट सोशलवर चर्चेत आहे.

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच तो पानिपत सिनेमात दिसला होता. हा एक पीरियड ड्रामा होता. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ठिकठाक कमाई केली. यानंतर तो संदीप और पिंकी फरार या सिनेमात दिसणार होता. 20 मार्च 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. लवकरच तो भूत पोलीस सिनेमात काम करताना दिसणार आहे.