Video : भाचीसोबत डान्स करताना दिसला ‘भाईजान’ सलमान ! बहिण अर्पितानं शेअर केला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) याचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे सर्वांना माहितच आहे. अनेकदा सलमान भाचे, पुतणे यांच्या सोबत मस्ती करताना किंवा खेळताना दिसत असतो. याचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील खूपदा समोर आले आहेत. नुकताच सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो भाची आयत सोबत डान्स करत आहे. सलमानची बहिण अर्पिता खान हिनं व्हिडीओ शेअर केला आहे.

अर्पितानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सलमान अर्पिताची मुलगी म्हणजेच त्याची भाची आयत सोबत दिसत आहे. बॅकग्राऊंडला गाणं सुरू आहे आणि सॉफ्ट डान्स करताना दिसत आहे. भाचीला त्यानं कडेवर घेतलं आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर या व्हि़डीओत सलमान त्याच्या आगामी सिनेमाच्या लुकमध्ये दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना अर्पिता म्हणते, अमर्याद प्रेम. सलमान खान यानंही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सलमानचा हा अंदाज चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी आयतचा असा अंदाज पाहून त्याचं कौतुक केलं आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभु देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही. आता 2021 च्या ईदला हा सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय सलमान अंतिम आणि शाहरुख खानच्या पठाण सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तो किक 2 आणि कभी ईद कभी दिवाली सिनेमातही काम करणार आहे.