अभिनेता अरशद वारसीनं कोरोना व्हायरसवर शेअर केले ‘फनी’ मीम्स, पुढं झालं असं काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. हा विषाणू इतका प्राणघातक आहे की आतापर्यंत चीनमध्ये 259 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी संसर्गाच्या घटनांची संख्या 11 हजारांच्या पलीकडे गेली आहे. वुहानमधूनही भारतीयांना परत आणण्यात आले आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीने ट्विटरवर कोरोना विषाणूसंदर्भात एक मजेदार मीम्स शेअर केला आहे. यामुळे लोकांनी त्याला खूप ट्रोल केले.

अभिनेता अरशद वारसीने आपल्या ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटाची काही मजेदार सीन ट्विटरवर शेअर केली आहेत. यासह त्याने लिहिले, ‘माझ्या मित्राने मला काही मौल्यवान माहिती पाठविली आहे.’

अरशद वारसीने शेअर केलेल्या मजेदार मीम्समध्ये ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चे चार स्क्रीन शॉट्स आहेत. याच्या वर असे लिहिले आहे की, ‘कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्याचे हे मार्ग आहेत.’ यावर लोकांनी अरशद वारसीला बरेच ट्रोल केले. एका युजरने लिहिले आहे की, ‘सॉरी पण यांची चेष्टा करू नका.’

काही युजरने याला जातिवादी म्हटले आहे. काही लोकांनी अरशद वारसी यांना हे ट्विट हटवण्यास सांगितले आहे. शनिवारी चीनच्या वुहान येथून एअर इंडियाचे विमान 324 भारतीयांसह भारतात पोहोचले.

असेही बोलले जात आहे की चीनने तेथे 6 भारतीयांना थांबविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सहा जणांच्या तपासणी दरम्यान त्यांच्या शरीराचे तापमान जास्त आढळले. म्हणून तेथील चिनी अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले.

याशिवाय कोरोना विषाणूचा संशय असलेल्या 6 जणांना दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या विविध चाचण्या केल्या गेल्या आहेत, ज्यांच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. त्याचबरोबर गुरुवारी केरळमध्ये भारतातील कोरोना विषाणूची पहिली नोंद झाली आहे. यामुळे पीडित व्यक्तीकडे लक्ष ठेवून त्यांना वेगळ्या वॉर्डात ठेवले गेले. इथल्या आणखी एका व्यक्तीलाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे.