Drugs Case : ‘भारती-हर्ष’ नंतर आणखी एक प्रसिद्ध बॉलिवूड आर्टीस्ट सुरज गोदांबे NCB च्या ताब्यात !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर या ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) नं आजवर अनेक कलाकारांची चौकशी केली आहे आणि काहींना अटकही केली आहे. प्रसिद्ध मेकअप आर्टीस्ट सुरज गोदांबे याला एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेतलं आहे.

एनसीबीनं गुरुवारी (दि 10 डिसेंबर) सकाळी त्याच्या घरावर छापा मारला. त्यावेळी त्याच्या घरात 2 कोटी 50 लाखांचे ड्रग्ज सापडले. याशिवाय 13 लाख 51 हजार रुपयांची रोख रक्कमही सापडली आहे. या पैशांचा हिशोब त्याला देता आला नाही. परिणामी एनसीबीनं त्याला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. आता या चौकशीत बॉलिवूडमधील आणखी एक नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुधवारी (9 डिसेंबर) एनसीबीनं मुंबईच्या अंधेरी भागात छापेमारी केली. यात मोठा ड्रग्स पेडलर रीगल महाकाल याला अटक केली आहे. एनसीबीला मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि कॅश सापडली आहे. ही कारवाई म्हणजे एनसीबीचं मोठं यश असल्याचं सांगितलं गेलं होतं.