कंगना रणौतवर चोरीचा आरोप, ‘मणिकर्णिका रिटर्न्स’च्या घोषणेनंतर वादात सापडली अ‍ॅक्ट्रेस

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं नुकतीच मणिकर्णिका फ्रेंचायजी पुढं नेण्याची घोषणा केली. लवकरच ती मणिकर्णिका रिटर्न्स : द लिजेंड ऑफ दिद्दा (Manikarnika Returns: The Legend Of Didda) मध्ये दिसणार आहे. मणिकर्णिका सिनेमात झाशीच्या राणीची कहाणी दाखवण्यात आली होती. तर या सिनेमात मात्र काश्मीरच्या राणी बद्दल सांगितलं जाणार आहे. परंतु सिनेमाची घोषणा करताच अ‍ॅक्ट्रेसवर चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. दिद्दाचे रायटर आशिष कौल (Aashish Kaul) यांनी आरोप केला आहे की, कंगनानं त्यांची कहाणी चोरली आहे.

एका मुलाखतीत बोलताना आशिष यांनी सांगितलं की, आपल्या अधिकारांसाठी लढणारी कंगना माझ्या सारख्या एका रायटरच्या अधिकारांचा खुलेआम हनन करत नाहीये का. कंगनानं अधिकारांचं उल्लंघन केलं आहे. हे बेकायदेशीर आहे. देशाच्या आयपीआर आणि कॉपीराईट कायद्यांचं पूर्णपणे उल्लंघन आहे.

पुढं ते म्हणाले की, कंगनाचा हा अंदाज काही समजला नाही. मी याला एक इंटेलेक्चुअल चोरी म्हणेल असंही त्यांनी सांगितलं.

कंगना रणौतनं गुरुवारीच मणिकर्णिका रिटर्न्स : दि लिजेंड ऑफ दिद्दा या शीर्षकानं सिनेमा बनवणयाची घोषणा केली होती. फिल्ममेकर कमल जैन सोबत मिळून ती हा सिनेमा बनवणार आहे. तिनं यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली होती.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.