Birthday SPL : आयुष्मान खुरानाची, पत्नी ताहिरा कश्यपसाठी खास पोस्ट ! ‘अशा’ दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यानं त्याची पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) हिला खूपच खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सध्या आयुष्मानची पोस्ट सोशलवर चर्चेत आहे.आयुष्माननं त्याच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या दोन फोटोत ताहिरा ग्लॅमरस आणि बोल्ड लुकमध्ये दिसत आहे. या फोटोंसोबत त्यानं खास नोट शेअर केली आहे.

आपल्या लांबलचक पोस्टमध्ये आयुष्मान म्हणतो, मला निवडण्यासाठी आभार. मी प्रत्येक गोष्टीसाठी तुझा आभारी आहे. तुझं प्रेम, तुझी संवेदना, चरित्र, विनोदी स्वभाव, चांगली स्क्रिप्ट निवडण्याची तुझी समज आणि तू. माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आयुष्मान आणि ताहिरा यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं. ताहिरा एक लेखिका आहे. तिनं आय प्रॉमिस नावाचं पुस्तक लिहिलं आहे.

2018 साली ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता. तिनं स्वत: सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली होती. कॅन्सरच्या ट्रीटमेंट नंतर तिनं तिचे काही फोटो सोशल मीडियावरून शेअर केले होते. तिनं जिद्दीनं कॅन्सरवर मात केली होती.

आयुष्मानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो अभिषेक कपूरचा चंडीगढ करे आशिकी सिनेमाची शुटींग करत आहे. या सिनेमात त्याच्या सोबत वाणी कपूर दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तो गुलाबो सिताबो सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्यानं बिग बी अमिताभ बच्चन सोबत काम केलं होतं. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता.