COVID-19 : बॉलिवूडमध्ये ‘कोरोना’चा कहर ! गेल्या 34 तासात ‘महानायक’ अमिताभ,अभिषेक, ऐश्वर्यासह 11 सेलेब्स आढळले ‘कोरोना’ Positive

पोलिसनामा ऑनलाईन – गेल्या 4 महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. कोरोनाच्या केसेस रोजच वाढत आहेत. बॉलिवूडमध्येही याचा प्रकोप वाढताना दिसत आहे. लोकांना या महामारीबद्दल जागरूक जागरूक करणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन आता कुटुंबासहित कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. याशिवाय बी टाऊनमधून इतरही अनेक केसेस समोर येताना दिसत आहेत.

बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात

अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटीव आल्यानंतर अभिषेक बच्चननंही कोरोना टेस्ट केली आणि त्यालाही कोरोना झाल्याचं समोर आलं. यानंतर बच्चन कुटुंबाच्या इतर सदस्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्य बच्चन पॉझिटीव्ह निघाल्या. बच्चन कुटुबात फक्त जया बच्चनच कोरोना निगेटीव्ह आल्या.

अनुपम खेरचं कुटुंबही कोरोनाच्या विळख्यात

बॉलिवूड स्टार अनुपम खेरचं कुटुंबही कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. अनुपम यांनी स्वत: ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली होती.

त्यानी सांगितलं की, त्यांची आई दुलारी खेर आणि भाऊ राजू खेर हेही कोरोना पॉझिटीव निघाले आहेत. अनुपम यांची वहिणी आणि भाची यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

टीव्ही मालिका कसौटी जिंदगी की, फेम अ‍ॅक्टर पार्त समथान यानंही कोरोना टेस्ट केली होती ज्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. यानंतर मालिकेची शुटींगही थांबवण्यात आली होती.

उंगली फेम अ‍ॅक्ट्रेस रेचल व्हाईट हिलाही कोरोना झाला आहे. ट्विटरवरून तिनं यासंदर्भात माहिती दिली होती. सध्या ती होम क्वारंटाईनमध्ये आहे.

बालाजी टेलीफिल्म्सची एक्झिक्युटीव वाईस प्रेसिडेंट तनुश्री दासगुप्ता हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिनंही तिच्या हेल्थबद्दल अपडेट्स दिले आहेत. ती हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिड असून लवकरच बरी होईल असंही तिनं सांगितलं आहे.