×
Homeमनोरंजनअक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटासाठी उत्तर प्रदेशात बनणार जैसलमेरचा सेट, चित्रपट निर्मात्यांनी...

अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटासाठी उत्तर प्रदेशात बनणार जैसलमेरचा सेट, चित्रपट निर्मात्यांनी केली घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट बच्चन पांडेचे शूटिंग सुरू झाले आहे.या चित्रपटात कृती सॅनॉन, जॅकलिन फर्नांडिस, अरशद वारसी, पंकज त्रिपाठी आणि प्रतीक बब्बर यांची महत्वाची भूमिका आहे.या चित्रपटाचे शूटिंग जानेवारीत जैसलमेरमध्ये सुरू झाले होते. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागले. आता निर्मात्यांनी ठरवले की आता ते चित्रपटाचे उर्वरित शूटिंग उत्तर प्रदेशमध्ये करतील.

नुकत्याच आलेल्या अहवालानुसार टीम सदस्यांनी हा निर्णय घेतला की, चित्रपटाचे शूटिंग आता जैसलमेर ऐवजी उत्तर प्रदेशात होईल जिथे हा सिनेमा सेटल झाला आहे.या टीमचा विश्वास आहे की, जयपुर शहराशी संबंधित दृश्यांना चित्रपटामध्ये जोडले जाईल आणि उर्वरित चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशमध्ये होईल.

‘बच्चन पांडे’ 26 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका गँगस्टरची भूमिका साकारत आहे, ज्याला अभिनेता बनायचेय. कृती सॅनॉन एक पत्रकार असून जिला दिग्दर्शक व्हायचे आहे. चित्रपट रिलीज होण्यास अजून बराच वेळ आहे. दरम्यान, चित्रपटाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत, ज्यामुळे याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

बच्चन पांडेची टीम सध्या जैसलमेरमध्ये असून या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू असून यावर्षी मार्चपर्यंत ते पूर्ण होईल . संपूर्ण टीम राजस्थानमधील गडीसर तलाव आणि जैसलकोट अशा ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण करणार होती. या चित्रपटाचे मुख्य कलाकार अक्षय कुमार आणि कृती सॅनॉन यांचे फोटो ऑनलाइन समोर आले आहे. दोघांना एमबीएन शाळेचे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनसोबत क्लिक केले होते. हे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत आहे.

Must Read
Related News