Video : १५ ऑगस्टला समोर येणार ‘बाटला हाऊस’ एनकाऊंटरचं सत्य, ऑफिशियल ‘ट्रेलर’ प्रदर्शित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सध्या एकापेक्षा एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपटांची स्पर्धा चालू आहे. १५ ऑगस्टला प्रदर्शित होणारा अभिनेता जॉन अब्राहमचा चित्रपट ‘बाटला हॉउस’ ची सोशलवर खूपच चर्चा सुरु आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टीजर पाहून चाहत्यांचा उत्साह वाढत चालला आहे.

हा चित्रपट ‘बाटला हाउस’ २००८ च्या विवादित एनकाउंटरवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता जॉन अब्राहमने पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, पोलीस ऑफिसर संजीव कुमार यादव यांची भूमिका जॉन अब्राहम साकारणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आता चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

‘एयरलिफ्ट’चे दिग्दर्शन केलेले निखिल आडवाणी हा चित्रपट सांभाळत आहे. चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे. १५ ऑगस्ट तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या तारखेवर फक्त जॉन अब्राहमचा चित्रपट नाही तर साऊथचे सुपस्टार प्रभासचा ‘साहो’ आणि अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/Bzuwh60lPvu/

त्याचबरोबर नेटफिक्सची प्रसिद्ध वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ चा दुसरा सीजन ही प्रदर्शित होणार आहे. एकाच तारखेला एवढ्या चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. या दिवशी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

आरोग्यविषयक वृत्त

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

अंगावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ फळ आवश्य खा, जाणून घ्या फायदे

शरीरातील हिमोग्लोबिन (HB) वाढवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

सिनेजगत

शुक्रवारी ‘असं’ तोंड करते ‘हॉट’ अभिनेत्री पूनम पांडे !

‘त्या’ क्षेत्रात अभिनेत्री कॅटरिनाचा ‘भाव’ वाढला !

PHOTOS: ‘पति पत्नी और वो’ चित्रपटाच्या स्क्रिप्टवर भूमि पेडनेकरनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया

बहुजननामा

RSS चा राष्ट्रनिर्मितीशी संबंध काय ? – अशोक चव्हाण

खासदार ‘जलील’ यांच्याविरूद्ध निवडणूक याचिका दाखल

दुचाकी वापरताय मग रेशन कार्ड होणार रद्द, सरकारचा नवा निर्णय