‘बेख्याली’ सिंगर सचेत टंडन आणि परंपरा ठाकुर यांनी केला साखरपुडा ! फोटो पाहून चाहतेही हैराण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बेख्याली सिंगर आणि कंपोजर सचेड टंडन (Sachet Tandon) आणि परंपरा ठाकूर (Parampara Thakur) यांनी आपलं नात पुढं नेत आता साखरपुडा केला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर चाहतेही हैराण झाले आहेत. शनिवारी जेव्हा दोघांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले तेव्हा लोकांना एक चकित करणारं सरप्राईज मिळालं. कारण सचेत आणि परंपरा यांनी साखरपुडा तर दूर परंतु त्यांच्या नात्याबद्दलही कधी कोणती माहिती शेअर केली नव्हती. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशलवर तुफान व्हायरल झाले आहेत.
सचेत आणि परंपरा यांनी इंस्टावरून साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. समोर आलेल्या फोटोत दोघं एमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत. या सेरेमनीचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहेत. यात त्यांचा रोमँटीक अंदाज पाहायला मिळत आहे.
सचेत आणि परंपरा यांच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर फोटोत दिसत आहे की, सचेतनं पिंक कलरचा सूट घातला आहे आणि परंपरानं देखील त्याल मॅचिंग अशी शिमरी साडी घातली आहे. दोघंही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. हे फोटो जसे इंटरनेटवरून समोर आले तसेच लगेच सोशलवर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमााचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या फोटोंवर कमेंट करत आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे.