Besharam Bewaffa Song : दिव्या खोसला कुमार आणि गौतम गुलाटी यांचं नवं गाणं रिलीज !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टी सीरिजचं नवीन गाणं बेशरम बेवफा (Besharam Bewaffa) युट्युबवर रिलीज करण्यात आलं आहे. सध्या हे गाणं लोकांना आवडताना दिसत आहे. हे इमोशन साँग दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar), गौतम गुलाटी (Gautam Gulati) आणि सिद्धार्थ गुप्ता (Siddharth Gupta) यांच्यावर शुट करण्यात आलं आहे. याला बी प्राक ( B Praak) आणि जानी (Jaani) नं आवाज दिला आहे.

दिव्यानंही सोशलवरून गाणं शेअर केलं आहे. गाणं शेअर करताना दिव्या म्हणते, बेशरम बेवफा गाणं तुमच्यासाठी युट्युबवर उपलब्ध आहे. लव्ह हर्ट्स अशी या गाण्याची टॅगलाईन आहे. राधिका राव (Radhika Rao) आणि विनय सप्रू (Vinay Sapru) यांनी व्हिडीओचं डायरेक्शन केलं आहे. बी प्राक आणि जानी यांनी हे गाणं लिहिलं आहे.

दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सत्यमेव जयते 2 सिनेमात ती लिड रोल साकारणार आहे. मिलाप झवेरी सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. जॉन अब्राहम या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे. तेलगू सिनेमा लव टुडे मधून दिव्यानं अॅक्टींगला सुरुवात केली होती. 2004 साली आलेल्या अब तुम्हारे हवाले वतन साथियों सिनेमातून तिनं हिंदी सिनेमात पाऊल टाकलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. 2014 मध्येच तिनं यारियां सिनेमातून डायरेक्शनमध्ये डेब्यू केला. 2016 साली तिचा दुसरा डायरेक्टोरियल सिनेमा सनम रे रिलीज झाला. यात पुलकित सम्राट, यामी गौतम आणि उर्वशी रौतेला प्रमुख भूमिकेत होते.

 

You might also like