Birthday SPL : प्रेमात धोका मिळाल्यानंतर विक्रम भट यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न ! सुष्मिता सेनवर आला होता ‘आळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये हॉरर सोबत बोल्डनेसचा तडका देणारे फिल्ममेकर विक्रम भट (Vikram Bhatt) यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. परंतु तुम्हाला हे माहित नसेल की, त्यांचं हृदय तुटल्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. विक्रम भट यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्यांशी संबंधित असेच काही न ऐकलेले किस्से जाणून घेणार आहोत.

विक्रम भट यांचा जन्म 27 जानेवारी 1969 रोजी मुंबईत झाला होता. 14 व्या वर्षीच त्यांनी इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती. ते विजय भट यांचे नातू आहेत. विक्रम यांचे वडिल प्रवीण भट हे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर राहिले आहेत. विक्रम यांनी महेश भट यांच्या सोबत 2 वर्ष काम केलं आहे. परंतु दोघांमधये कोणतंही ब्लड रिलेशन नाहीये. काहींना वाटतं की, ते भाऊ आहेत परंतु असं अजिबात नाहीये. विक्रम यांनी त्यांची कॉलेज फ्रेंड अदिती सोबत लग्न केलं होतं. दोघांना एक मुलगी देखील आहे.

एका मुलाखतीत विक्रम भट यांनी सांगितलं होतं की, त्यांना मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनवर प्रेम झालं होतं. यामुळं त्यांचं लग्ही मोडलं होतं. विक्रम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला आहे. परंतु याचं कारण सुष्मिता सेन होती ही गोष्ट मात्र त्यांनी नाकारली आहे. विक्रम यांनी सांगितलं की, सुष्मितावर त्यांचं प्रेम होतं. परंतु लग्न मोडल्यानं ते खूप उदास झाले होते. त्यांना अजिबात त्यांचं लग्न मोडू द्यायचं नव्हतं.

लग्न मोडल्यानंतर ते एवढे दुखी होते की, 6 व्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांना आत्महत्या करू वाटत होती. सुष्मितानंतर अभिनेत्री अमीषा पटेल सोबतही त्यांनी त्यांचं 5 वर्षे रिलेशन होतं. परंतु ही जोडीही टिकली नाही.