भाईजान सलमान खान ‘या’ कारणामुळं सोडतोय ‘Bigg Boss 13’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अशी चर्चा सुरू आहे की, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान बिग बॉसचं घर सोडण्याच्या तयारीत आहे. असेही म्हटले जात आहे की, सलमान खानच्या जागी फराह खान बिग बॉसच्या घराची नवी मालकीन असू शकते. सलमानच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धकांच्या वाईट वर्तणुकीमुळे सलमान खान नाराज आहे.

पीटीआयसोबत बोलताना सूत्रांनी सांगितलं की, “हे खरं आहे की, 53 वर्षीय सलमान खान बिग बॉस सोडत आहे. फराह खान त्याची जागा घेणार आहे. स्पर्धकांच्या वर्तणुकीमुळे तो नाराज आहे. याची घोषणा सलमाननं शोमध्येही केली होती. सलमान खानची बिग बॉससाठी शेवटची शुटींग अद्याप ठरलेली नाही. अशी आशा आहे की, जानेवारीपासून फराह बिग बॉसची होस्ट असेल.”

असाही अंदाज लावला जात आहे की, सलमानचं कुटुंब त्याच्या तब्येतीला घेऊन चिंतीत असून त्यांनी त्याला 24 तास सतत शुटींग करण्याची सवय बदलायला सांगितली आहे. परंतु सलमानचे वडिल सलीम खान यांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलं आहे.

सलीम खान यांनी पीटीआयला सांगितले की, “सलमान निरोगी आहे. तब्येतीची समोर आलेली बातमी चुकीची आहे. आम्ही त्याला शो सोडायला सांगणार नाही. तो 24 तास काम करतो. परंतु हे त्याच्यावर आहे. आम्ही कोणता सल्लाही दिलेला नाही आणि कोणती चिंताही व्यक्त केलेली नाही.” 2011 पासून सलमान बिग बॉससोबत जोडला गेला आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like