Bigg Boss 13 : देवोलिना आणि शेफाली एकमेकींशी ‘भिडल्या’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 मध्ये सध्या स्पर्धकांमध्ये तणाव दिसत आहे. याचे कारण म्हणजे फिनालेची रेस. यामुळे घरातील दोन मुली एकमेकांना भिडताना दिसल्या. दोघांमध्ये काहीशी मारहाण होताना दिसली.

बिग बॉस 13 च्या घरात नॉमिनेशन टास्क ठेवण्यात आलं होतं. यासाठी दोन टीम केल्या होत्या. टीमला आपल्या तिजोरीत जास्तीत जास्त पैसे गोळा करायचे होते. यासाठी ते एकमेकांचे पैसे चोरूही शकत होते. यासाठी देवोलिना डंबल घेऊन दुसऱ्या टीमची तिजोरी तोडण्यासाठी धावते. हे पाहताच शेफाली तिला अडवण्याचा प्रयत्न करते. यानंतर दोघींमध्ये मारहाण होताना दिसते. रश्मीही मध्यस्थीचा प्रयत्न करते.

देवोलिना आणि शेफाली एकमेकांना भिडल्याचा व्हिडीओ बिग बॉसच्याच ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही वेळ दोघी मारहाण करताना दिसतात. नंतर घरातील सदस्य दोघींना वेगळं करतात. हे टास्क खूपच रंजक होतं. नॉमिनेशनमध्ये मुलींपैकी रश्मी देसाई आणि माहिरा शर्माचं नाव पुढं आलं आहे.

बिग बॉस 13 मध्ये फिनाले विक सुरू झालं आहे. सलमानने स्वत: याबाबत घोषणा केली आहे. सोबतच घरात पावर पीकही सुरू झालं आहे. यामध्ये टास्क जिंकणाऱ्या स्पर्धकाला सुपर पवार मिळणार आहे. पुढे खूप काही रंजक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like