वारिस पठाणांवर राहुल महाजनांचा ‘पलटवार’, म्हणाले – ‘एकटा येतो अन् सांगतो वाघ कोण आणि गिधाड कोण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – AIMIM चे नेते वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर आणि वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेकांच्या यावर प्रतिक्रिया येताना दिसत आहे. अनेक कलाकारांनीही वारिस पठाण यांच्यावर टीका केली आहे. बिग बॉसमध्ये दिसलेले राहुल महाजन यांनी तर पठाण यांचं चॅलेंज स्विकारलं आहे.

राहुल महाजन आणि ट्विट केलं आहे की, “हे वारिस पठाण कोण आहे ? ज्या गल्लीत यायचं आहे, मी येतो. तेही एकटा येतो आणि सांगतो की, वाघ कोण आहे आणि गिधाड कोण आहे. जेव्हा असा दीड दमडीचा नेता एखाद्या समाजाचं नेतृत्व करेल तो समाज प्रगतीपथावर जाणारच नाही.”

https://twitter.com/TheRahulMahajan/status/1230514562106920960

राहुल महाजन व्यतिरीक्त स्वरा भास्कर, रंगोली चंदेल, पायल रोहतगी अशा अनेक कलाकारांनी पठाण यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. रंगोली चंदेलनं ट्विट केलं आहे की, “करा किती मस्ती करायची आहे. तो सगळं पहात आहे. उपरवाला नाही, गुजरातवाला.”

https://twitter.com/Rangoli_A/status/1230412136280551424

https://twitter.com/Rangoli_A/status/1230541735798824960

पायल रोहतगी आपल्या ट्विटमध्ये म्हणते, “राम राम जी. या मदरशातून पास झालेल्याला स्वातंत्र्य हवं आहे. अशा जिहादींना देशाच्या बाहेर हाकललं पाहिजे. अशांची धर्मनिरपेक्ष भारतात काहीच जागा नाही. हे नेहमची हिंदूंचा तिरस्कार करतात. CAA 2020 समजवल्यानंतरही ते अशा प्रकारे घाबरवण्याचं नाटक करत आहेत.”

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1230397938918133760

या विषयावर अद्याप सोनम कपूर, फरहान अख्तर आणि अनुराग कश्यप यांनी मौन पाळलेलं आहे. तेही नेहमीच सोशलवर आपलं मत मांडत असतात. फरहान अख्तरनंही सीएएला विरोध केला होता. तो रस्त्यावर उतरला होता.

स्वरा भास्कर तिच्या ट्विटमध्ये म्हणाली, “वारिस पठाण यांच्या वक्तव्यामुळे CAA आणि NRC विरोधात केलं जात असलेल्या आंदोलनाला वेगळं वळण मिळू शकतं. जर तुम्ही CAA आणि NRC विरोधात फायद्याचं बोलू शकत नसाल तर किमान काहीतरी बरळू नका. आपण केलेलं वक्तव्य बेजबाबदार आणि अत्यंत निदंनीय आहे.” असं स्वरा म्हणाली.

काय म्हणाले वारिस पठाण ?

गुरुवारी कर्नाटकात CAA आणि NRC विरोधात झालेल्या आंदोलनात वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. वारिस पठाण म्हणाले, “इट का जवाब पत्थर से हे आता आम्ही शिकलो आहोत. ते मागून मिळालं नाही तर हिसकावून घ्या. आम्ही मुद्दाम महिलांना पुढे केलं आहे. विचार करा फक्त आमच्या सिंहीणी पुढे आल्या आहेत तर यांचा घाम निघालाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर आलो तर काय होईल. आम्ही 15 कोटी आहोत परंतु 100 कोटींवार भारी आहोत हे लक्षात ठेवा.” अशा प्रकारे एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी चिथावणीखोर आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते.