‘नागीण -4’ मध्ये दिसणार रश्मी देसाई, ‘या’ अभिनेत्रीला करणार ‘रिप्लेस’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टीव्ही जगतातील गाजलेल्या टीव्ही शोपैकी एक असलेल्या बिग बॉसच्या १३व्या सीझनपासून चर्चेत असलेली रश्मी देसाई आता नव्या शोसाठी चर्चेत आली आहे. रश्मी देसाई जरी या सीझनमध्ये जिंकली नसेल, परंतु तिने लोकांची मने खूप जिंकली. आता असे वृत्त समोर येत आहे की रश्मी देसाई लवकरच नागिन-४ मध्ये दिसू शकते, तथापि, अद्याप याची अधिकृत घोषणा व्हायचे बाकी आहे.


सांगण्यात येत आहे की नागिन-४ पासून जास्मीन भसीनला बाहेर करण्यात आले आहे आणि लवकरच रश्मी देसाई तिच्या जागी दिसेल अशी चर्चा होत आहे. बर्‍याच अहवालात असेही म्हटले गेले आहे की रश्मीने या शोचे शूटिंगही सुरू केले आहे आणि येत्या काही दिवसांत ती पडद्यावर दिसणार आहे. परंतु, या वृत्तावर अद्याप तरी अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी, जास्मीन ने शोमध्ये येणाऱ्या एका ट्विस्टमुळे शो सोडला होता आणि त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली होती.


जर या शोमध्ये रश्मी देसाई दिसली तर बिग बॉस नंतर तिच्यासाठी ही चांगली सुरुवात मानली जाईल. तसेच जास्मिन भसीनच्या पात्रास रश्मी किती चांगल्या प्रकारे निभावते हेदेखील पाहणे महत्वाचे आहे. आता रविवारी प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये समजेल की रश्मी देसाईने साकारलेल्या भूमिकेस किती न्याय दिला आहे ते, विशेष म्हणजे शोमध्ये तिची एन्ट्री झाली तर रश्मीच्या चाहत्यांसाठी ती एक आश्चर्याची बाब असणार आहे.


जास्मिन का सोडला शो ?

शोमधून बाहेर पडताना जास्मिन म्हणाली होती की, ‘मला याबाबत दुःख वाटतं की लोकांना वाईट वाटतंय पण नागिन शो हा असा शो आहे, ज्यामध्ये ट्विस्ट आणि टर्न्स भरपूर आहेत आणि माझ्या व्यक्तिरेखेला देखील यातून बाहेर पडावेच लागेल. जेव्हा हा शो सुरू झाला तेव्हा पहिला ट्विस्ट असा होता की मी (नयनतारा) नागीण होते, पण नंतर असे समोर आले की मी नाही तर वृंदा (निया शर्मा) नागीण आहे.’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like