अभिनेत्री सना खानचा पती मुफ्ती अनस आहे तरी कोण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस स्पर्धक सना खान (Sana Khan) हिनं तिच्या चाहत्यांना इंडस्ट्री सोडत झटका दिला होता, तिनं घोषणा केली होती की, मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी ग्लॅमरची दुनिया सोडl आहे. सना खाननं 20 नोव्हेंबर रोजी सूरत, गुजरातमध्ये मुफ्ती अनस नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. सना खान आणि मुफ्ती अनस यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तिनं सोशल मीडियावर तिचं नाव बदललं आहे. अनेकांना तिच्या पतीबद्दल उत्सुकता होती की, मुफ्ती अनस कोण आहे. आज याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

सनानं आता लग्न केल्यानंतर तिचं नाव बदलून सईद सना खान (Sayied Sana Khan) असं केलं आहे. सनानं तिच्या पतीसोबत पहिला फोटोही सोशलवर शेअर केला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोण आहे मुफ्ती अनस ?
मुफ्ती अनस हे गुजरातच्या सुरतमधील रहिवासी आहेत. ते एक धार्मिक नेता किंवा इस्लामिक स्कॉलर आहेत. त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते एक बिजनेसमन आहेत. बिग बॉस 7 फेम एजाज खाननं सना आणि मुफ्ती यांची भेट घडवली होती.

सनानं 9 ऑक्टोबर रोजी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सागितलं होतं. सोशलवर हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत तिनं चाहत्यांसाठी एक नोट लिहिली होती. यात तिनं सांगितलं होतं की, एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीला गुड बाय करत आहे.

सनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर 2014 मध्ये आलेल्या सलमान खानच्या जय हो सिनेमात तिनं काम केलं आहे. याशिवाय ती बिग बॉस 6 मध्येदेखील दिसली आहे. एक टीव्ही अ‍ॅक्ट्रेस म्हणूनही ती खूप फेमस होती.