अभिनेत्री सना खाननं लग्नानंतर बदललं नाव ! केला ‘हा’ बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस स्पर्धक सना खान (Sana Khan) हिनं तिच्या चाहत्यांना इंडस्ट्री सोडत झटका दिला होता. तिनं घोषणा केली होती की, मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी ग्लॅमरची दुनिया सोडत आहे. सना खाननं 20 नोव्हेंबर रोजी सुरत, गुजरातमध्ये मुफ्ती अनस नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. सना खान आणि मुफ्ती अनस यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तिनं सोशल मीडियावर तिचं नाव बदललं आहे.

सनानं आता लग्न केल्यानंतर तिचं नाव बदलून सईद सना खान (Sayied Sana Khan) असं केलं आहे. सनानं तिच्या पतीसोबत पहिला फोटोही सोशलवर शेअर केला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

सनाच्या लग्नाचे जे व्हिडिओ समोर आले होते, त्यात सना आणि तिचा पती व्हाईट आउटफिटमध्ये दिसत आहे. आधी ते पायऱ्या उतरत आहेत आणि केक कापताना दिसत आहे, असंही यात दिसलं होतं. कपल यावेळी खूपच खूश दिसून आलं. तिनं मुफ्ती अनसला केकही भरवला. व्हाईट ब्राईडल आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

सनानं 9 ऑक्टोबर रोजी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सागितलं होतं. सोशलवर हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत तिनं चाहत्यांसाठी एक नोट लिहिली होती. यात तिनं सांगितलं होतं की, एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीला गुड बाय करत आहे.

सनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर 2014 मध्ये आलेल्या सलमान खानच्या जय हो सिनेमात तिनं काम केलं आहे. याशिवाय ती बिग बॉस 6 मध्येदेखील दिसली आहे. एक टीव्ही अ‍ॅक्ट्रेस म्हणूनही ती खूप फेमस होती.