Jayashree Ramaiah Death : कन्नड अभिनेत्री जयश्री रमैयाची घरात गळफास घेऊन आत्महत्या !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कन्नड सिनेमातील ॲक्ट्रेस आणि बिग बॉस कन्नडमधील एक्स स्पर्धक जयश्री रमैया (Jayashree Ramaiah) ही आज तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. बंगळुरू मधील तिच्या घरात तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

जयश्री रमैया गेल्या काही काळापासून डिप्रेशनमध्ये होती. अशी माहिती आहे की, बंगळुरूमधील संध्या किरण आश्रमात तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या अचानक जाण्यानं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

गेल्या वर्षी जयश्रीनं फेसबुकवरून तिच्या डिप्रेशनविषयी माहिती दिली होती. तिनं सोशल मीडिया अकाऊंटवर एक लाईव्ह सेशन केलं होतं. ती डिप्रेशनचा सामना करू शकत नाही तिला इच्छा मृत्यू हवाय असा धक्कादायक खुलासाही तिनं केला होता. खूप काळ काम न मिळाल्यानं ती परेशान होती. याबद्दल तिनं अनेक मित्रांनाही बोलून दाखवलं होतं.

जयश्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं बिग बॉस सीजन 3 मध्ये सहभाग घेतला होता.