Bigg Boss 13 च्या विजेत्याला मिळणार ‘दुप्पट’ Prize Money, जाणून घेऊन व्हाल ‘दंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 च्या फिनालेला आता अवघा एक दिवस उरला आहे. 15 फेब्रुवारीला देशात सर्वात मोठ्या रिअलिटी शोचा विनर मिळणार आहे. या शोमधून महिरा शर्मा बाहेर पडल्यानंतर आता घरात फक्त शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाब्रा, असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंह एवढेच सदस्य उरले आहेत. त्यामुळे या सर्वांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. पण या सीझनच्या विनरला प्राइझ मनी किती मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

कलर्स टीव्हीवर सुरु असलेल्या बिग बॉसच्या 13 सीझन सर्वाधिक लोकप्रिय ठरला. मात्र, विजेत्याला मिळणाऱ्या प्राइज मनी बद्दल कोणताही खुलासा शोच्या मेकर्सनी केला नव्हता. यापूर्वी विजेत्याला 50 लाख रुपये प्राइज मनी देण्यात येत होता. ताज्या माहितीनुसार, यावेळी विजेत्याला मिळणारी रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. या सीजनमधील विजेत्या स्पर्धकाला तब्बल एक कोटी रुपयांचे प्राइज मनी मिळणार असल्याने विजेता मालामाल होणार आहे.

दरम्यान, या शोला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बिग बॉसने यावेळचा सीझन चार आठवड्यांनी वाढवला होता. आत्तापर्यंत झालेल्या सीझनमधील यावेळचा सिझन सर्वात लांब चाललेला सीझन आणि सगळ्यात हटके सीझन ठरला आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनला बाकीच्या सीझनच्या तुलनेत चांगला टीआरपी मिळाला आहे. या सीझनमधील सर्वच सदस्यांनी प्रेक्षकांचे चांगलंचं मनोरंजन केले. त्यामुळे त्यांचा मोठा फॅनफॉलोविंग सोशल मीडियावर पहायला मिळत आहे.

You might also like