बिपाशा बसुनं करण सिंग ग्रोवरला स्विमिंग पूलमध्येच दिलं ‘Birthday Gift’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसु आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर बॉलिवूडमधील अनेक हॉट कपलपैकी एक आहे. या हॉट कपलनं आपल्या नात्याबद्दल नेहमीच बिंधास्तपणा दाखवला आहे. दोघे पती-पत्नी सोशलवरही आपलं प्रेम खुलेआम व्यक्त करत असतात. या कपलचे काही फोटो समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

बिपाशा आणि करण सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशनच एन्जॉय करत आहेत. सध्या करण आणि बिपाशानं इंस्टाग्रामवरून काही एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. फोटोत हे कपल समुद्रकिनारी रोमँटीक व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. बिपाशानं एक खूपच रोमँटीक फोटो शेअर केला आहे ज्यात ती पती करणला किस करताना दिसत आहे. सध्या करण बिपाशाच्या या किसिंगवाल्या फोटोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

रविवारी करण सिंग ग्रोवरचा वाढदिवस होता. करणनं आपला 38 वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्यासाठीच हे कपल मालदीवला गेलं होतं. बिपाशानं शेअर केलेल्या फोटोंपैकी काही फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना बिपाशा म्हणते, “माझ्या प्रत्येक गोष्टीतल्या पार्टनरसोबत माझं आणखी एक व्हॅकेशन एकदम सही होतं.” करण आणि बिपाशा 30 एप्रिल 2016 रोजी विवाहबद्ध झाले होते. या वर्षी त्यांच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण होणार आहेत.