‘मास्टरबेशन सीन’पूर्वी नव्हर्स होती कियारा, ‘अशी’ केली तयारी, फॅमलीसोबत पाहिला ‘तो’ सीन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बर्थडे गर्ल कियारा आडवाणीने २०१४ साली सुरु केलेल्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत ८ सिनेमे दिले आहेत. परंतु त्यातील तिचे दोन सिनेमे असे आहेत जे कोणीच विसरु शकत नाही. पहिली ती वेब सीरीज ज्यात कियाराने मास्टरबेशनचा सीन दिला होता. तिचा हा सीन खूप गाजला होता. कियारााचा दुसरा अविस्मरणीय सिनेमा म्हणजे कबीर सिंह. हा सिनेमाही वादात सापडला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने अनेक रेकॉर्ड तोडले.

photo-23

‘व्हायब्रेटर सीनपूर्वी मी खूप नर्व्हस होते’
कियाराने नेहा धुपियाच्या नो फिल्टर शोमध्ये सांगितले होते की, मास्टरबेशनमधील क्लायमॅक्स सीन कशा प्रकारे शुट करण्यात आला होता. ती म्हणाली, “व्हायब्रेटर सीनपूर्वी ती खूप नर्व्हस होती. करणने हा सीन करण्यासाठी अनेक प्रकारे समजावलं. त्यांना वाटत होते की, मी हा सीन बिंधास्तपणे करावा. मला असे सांगितले की, स्क्रिनवर व्हायब्रेटरवाल्या सीनचा खूप लहान पार्ट दाखवला जाईल.”

‘अशी केली व्हायब्रेटर सीनची तयारी’
कियारा म्हणाली की, “हा सीन करण्यासाठी माहिती मिळावी म्हणून मी गुगलवर सर्चही केलं होतं. मला जाणून घ्यायचे होते की, लोकं व्हायब्रेटरचा वापर कसा करतात. हे नेमकं काय आहे हे माहीत करून घेण्यासाठी मी ‘द अग्ली ट्रुथ’ सारख्या सिनेमातील काही सीनही पाहिले.” करणने दिलेल्या सल्ल्यावरही कियाराने चर्चा केली. तिने सांगितले की, “मी हा सीन ईमानदारीने करावा असा सल्ला करणने मला दिला होता.”

कियाराने फॅमिलीसोबत पाहिली लस्ट स्टोरी
कियाराने ही सीरीज फॅमिलीसोबत पाहिली होती हे सांगताना ती म्हणाली की, “माजी आजी सोबत रहायला आली होती तेव्हाच ही सीरीज रिलीज झाली होती. मी ही सीरीज माझ्या पॅरेंट्ससोबतही पाहिली आहे. सर्वांना ही सीरीज आवडली होती. त्यांना ऑर्गेजम सीनने काही फरक पडत नाही. मी सिनेमा साईन केला तेव्हाच हे त्यांना माहीत होते. मी त्यांना यासाठी आधीच तयार केले होते.”

व्हायब्रेटर सीनवर आजी म्हणाली
कियारा पुढे म्हणाली होती की, “माझी दादी अँग्लो इंडियन आहे. तिला काही सीन समजत नव्हते तेव्हा मी तिला समजावून सांगितले की, या सीनमध्ये ती मुलगी आपल्या कुटुंबासमोर ऑर्गेजम फील करत आहे. यावर आजी म्हणाली पहिल्यांदा कुटुंबासोबत आणि आता पूर्ण दुनियेसमोर. आजीचं हे उत्तर ऐकून मी शॉक झाले.”

आरोग्यविषयक वृत्त