Birthday SPL : सिनेमांपासून दूर आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री ! हॉटनेसमुळं कायमच घालते सोशलवर ‘धुमाकूळ’ (Photos)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस मिनिषा लांबा (Minissha Lamba) दीर्घकाळापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. परंतु तरीही चर्चेत राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. याचे कारण म्हणजे तिचा हॉट आणि बोल्ड लुक जो चाहत्यांना नेहमीच भुरळ घालत असतो. मिनिषा पुन्हा एकदा आपल्या काही फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनली आहे. यावेळी तिच्या या जबरदस्त हॉट फोटोंची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे. खास बात अशी आहे की, आज (सोमवार, दि 18 जानेवारी) मिनिषा तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्तानं पुन्हा तिचे काही फोटो अटेंशन घेताना दिसत आहेत.

मिनिषानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यातील काही फोटोत ती प्रचंड हॉट दिसत आहे. काही फोटोत तिनं बोल्ड बिकीनी सुद्धा घातली आहे. यात तिचा कातिलाना अंदाज पहायला मिळत आहे. घायाळ करणारे एक्सप्रेशन आणि मादक पोज ही तर मिनिषाची खासियत आहे. सध्या तिच्या या मादक फोटोंनी चाहतेही पागल झाले आहेत. काही फोटोत मिनिषा स्विमिंगपूलमध्ये चिल करताना दिसत आहे.

चाहत्यांना भुरळ घालणारे मिनिषाचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. मिनिषाचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

एका मॉडेलिंग प्रोजेक्टवर काम करत असताना फिल्ममेकर शुजित सरकारला ती एवढी आवडली की, त्यानं 2005 साली आलेल्या यहां या सिनेमातून मिनिषाला ब्रेक दिला. हा तिचा डेब्यू सिनेमा आहे. यानंतर तिनं अनेक सिनेमे केले. रणबीर कपूर सोबतही तिनं स्क्रीन शेअर केली आहे. मिनिषाला डेब्यू सिनेमातून बरीच लोकप्रियता मिळाली होती.

मिनिषा तेव्हाही खूप चर्चेत आली होती जेव्हा तिनं नाक आणि ओठांची सर्जरी केली होती. यानंतर तिचा लुक खूपच बदलला होता. यावेळीही तिनं खूप अटेंशन घेतलं होतं.

मिनिषाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिनं मॉडेलिंगनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 2005 साली आलेल्या ‘यहां’ या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. मिनिषा रणबीरच्या बचना ऐ हसीनो या सिनेमातही दिसली आहे. यानंतर तिनं हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, वेल डन अब्बा, भेजा फ्राय, जिला गाझियाबाद, कॉर्पोरेट, रॉकी द रेबेल, एंथनी कौन है, अनामिका, शौर्य आणि दस कहानियां अशा अनेक सिनेमात काम केलं. मिनिषा लांबानं अनेक नाटकांतही काम केलं आहे. आसमान, इंटरनेट वाला लव अशी तिची काही नाटकं सांगता येतील. मिनिषा बिग बॉस 8 मध्येही झळकली होती. 2017 साली आलेल्या संजय दत्तच्या भूमी या सिनेमात ती शेवटची दिसली.