Birthday SPL : लग्नाआधीच ‘प्रेग्नंट झाली होती कोंकणा सेन शर्मा ! घाईत उरकलं ‘या’ अभिनेत्यासोबत लग्न, नंतर झाला ‘घटस्फोट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) हिला आपण सर्वजण ओळखतो. आज कोंकणाची बॉलिवूडमध्ये वेगळी जागा आहे. कोंकणानं यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिच्या आयुष्यात अनेक चढउतारही आले आहेत. आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2010 मध्ये लग्नबंधनात अडकलेली कोंकणा आपल्या लग्नाच्यावेळी प्रेग्नंट होती. लग्नाच्या 6 महिन्यांनी लगेच तिनं मुलाला जन्म दिला. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत.

कोंकणानं लहानपणीच अ‍ॅक्टिंगला सुरुवात केली होती. प्रसिद्ध पत्रकार मुकुल शर्मा आणि डायरेक्टर, अ‍ॅक्टर अपर्णा सेन यांची ती मुलगी आहे. चाईल्ड आर्टिस्ट म्हणून तिनं करिअरला सुरुवात केली होती. 1983 मध्ये आलेल्या बंगाली सिनेमा इंदिरामधून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मोठी झाल्यानंतर तिनं एक जे आछे कन्या या बंगाली सिनेमातून इंडस्ट्रीत पाऊल टाकलं. हा सनेमा हिट झाला. यानंतर 2002 साली कोंकणानं सुप्रसिद्ध डायरेक्टर ऋतुपर्णो घोष यांच्या तितली या सिनेमात काम केलं.

कोंकणानं आपला बॉयफ्रेंड रणवीर शौरी सोबत लग्न केलं होतं. आजा नच ले या सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. अचानक कोंकणा प्रेग्नंट राहिल्यानं दोघांनीही घाईत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नावेळी प्रेग्नंट असणाऱ्या कोंकणा आणि रणवीरनं 2010 मध्ये लग्न केलं. यानंतर 6 महिन्यांनी लगेचच कोंकणानं मुलाला जन्म दिला. हारून असं तिच्या मुलाचं नाव आहे. परंतु हे लग्न जास्त दिवस टिकलं नाही. 2015 मध्ये कोंकणा सेन आणि रणवीर शौरीचा घटस्फोट झाला. यानंतर मुलाची कस्टडी कोंकणाला मिळाली.

कोंकणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2005 साली कोंकणानं मधुर भांडारकर यांच्या पेज 3 या हिंदी सिनेमात काम केलं. या सिनेमात तिचा लिड रोल होता. हा सिनेमा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाला. कोंकणानं मिस्टर अँड मिसेस अय्यर या इंग्रजी सिनेमातही काम केलं आहे. यासाठी तिला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा नॅशनल अवॉर्डही मिळाला आहे. खास बात अशी की, हा सिनेमा तिची आई अपर्णानं दिग्दर्शित केला होता.