‘ब्रेडमेकर’च्या ‘त्या’ वादग्रस्त जाहिरातीपासून दूर झाल्या खा. हेमा मालिनी ! युजर्स जाहिरातीला म्हणाले होते ‘रेसिस्ट’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आटा ब्रेडमेकरच्या त्या जाहिरातीपासून स्वत:ला वेगळं केलं आहे ज्यामुळं सोशलवर गोंधळ सुरू आहे. हेमा मालिनी या कंपनीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. या ब्रँडच्या अनेक उत्पादनासाठी त्या टीव्ही आणि प्रिंटमध्ये दिसल्या आहेत.

हेमा मालिनी यांनी ट्विट करत लिहिलं की, “केंट आाट्याचा अलीकडच्या जाहिरातीत जी दृश्ये उघड झाली आहेत ती माझ्या विश्वासासोबत मेळ खात नाही. चेअरमन यांनी या चुकीसाठी आधीच जाहीरपणे माफी मागितली आहे. मला हे स्पष्ट करायचं आहे की, मी समाजातील सर्वच वर्गांचा सन्मान करते. मी नेहमीच त्यांच्यासोबत उभी आहे.” हेमा यांनी कंपनीच्या चेअरमनचा माफीनामाही पोस्ट केला आहे. यात लिहिलं की, कंपनीचे चेअरमनही अशा विचारांचं समर्थन करत नाहीत. ही वादग्रस्त जाहिरात कंपनीनं परत घेतली आहे.

काय होता वाद ?
ट्विटरवर अनेक युजर्सनं या जाहिरातींचे स्क्रीनशॉट्स सोशलवर शेअर केले होते. यात असं काही लिहल्याचं दिसत आहे. तुमची मेड हातानं पीठ मळते का. तिचे हात संक्रमित असू शकतात. याच लाईनवर साऱ्यांचा आक्षेप होता. त्यांनी हे वाक्य क्लासिस्ट रेसिस्ट आणि भेदभाव करणारं आहे असं सांगितलं. यानंतर अनेकांनी माफी मागण्याची मागणी केली.