‘कोरोना’मुळं बंद असलेल्या जीममध्ये अभिनेता शाहिद कपूरला एन्ट्री ! BMC नं घेतली कडक ‘अ‍ॅक्शन’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसहित अनेक राज्यात शाळा, जीाम, कॉलेज आणि थिएटर सर्व काही बंद करण्यात आले आहेत. सर्व लोक खबरदारी घेताना दिसत आहे. अशात बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर मात्र जीममध्ये पोहोचला आहे. त्याच्या या निष्काळजीपणाच्या वर्तणुकीमुळं त्याला बीएमसीनं झापलं आहे.

रविवारी सायंकाळी शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत बांद्र्यातील जीम ग्रॅविटीमध्ये आला होता. जिम बंद होती. परंतु त्यांच्यासाठी 2 तास ओपन करण्यात आली. शाहिद आणि मीरा यांचे जीमच्या बाहेर पडतानाचे काही फोटोही समोर आले आहेत जे व्हायरल झाले आहेत. यानंतर त्यांच्यावर कडक अ‍ॅक्शन घेतली गेली. यानंतर सोमवारी जीम सील करण्यात आली. जीम मालकानं शाहिदचं जीमला येणं खोटं असल्याचं सांगितलं. यानंतर बीएमसी सरकारनं जीम मालकाला सरकारकडून जारी केलेल्या हेल्थ अ‍ॅड्वायजरीचं उल्लंघन केल्याबद्दल जवाब मागण्यात आला.

बीएमसीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, “या प्रकरणी शाहिद कपूर आणि जीमचा मालक युधिष्ठिर जयसिंगला नोटीस पाठवून जवाब मागण्यात आला आहे. जर जीम राज्यात दिले गेलेले निर्देश पाळत नसेल तर त्यांचं लायसन्स रद्द केले जाईल.

जीम मालक युधिष्ठिर एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हणाला, “मी जीम उघडली नव्हती. एक मित्र म्हणून मी त्याला मदत केली. जीम शुक्रवारपासून बंद आहे. सोमवारी जीम सील केल्याबद्दलची आम्हाला माहितीच नाहीये. तिथे कोणतीही कमर्शियल अ‍ॅक्टीविटी होत नव्हती. तिथे कोणतेही ट्रेनर्सही नव्हते. आम्ही सरकारच्या अ‍ॅड्वायजरीला फॉलो करतो.”

https://www.instagram.com/p/B86StVnHZbS/?utm_source=ig_embed

युधिष्ठिर पुढे म्हणाला, “शाहिद चंदीगढहूनन शुटींग करून आला होता. तिथे त्याला दुखापत झाली होती. मी फक्त एक मित्र म्हणून त्याला सांगत होतो की, अशा अवस्थेतच जर वर्कआऊट करायचं झालं तर कोणत्या मशीनवर कसं वर्कआऊट करावं. ज्याच्या मदतीनं तो घरीच वर्कआऊट करू शकेल.”