26/11 Mumbai Attacks : ‘द अटॅक ऑफ 26/11’ ते ‘हॉटेल मुंबई’ पर्यंत ‘या’ सिनेमांमध्ये दाखवण्यात आलेत धक्कादायक सीन्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर रोजीच्या हल्ल्याची घटना आज 12 वर्षांनंतरही लोकांच्या मनात ताजी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चित या घटनेनं बॉलिवूडच नाही, तर परदेशी फिल्ममेकर्सचंही लक्ष वेधलं. विविध बाजूंनी यावर सिनेमे बनवले गेले. आज 26/11 निमित्त अशाच काही यावर बनवलेल्या सिनेमांवर आणि वेब सीरिजवर एक नजर टाकूयात.

भारतीय सिनेमे –

1) द अटॅक ऑफ 26/11 – मुंबई हल्ल्यावर पहिला सिनेमा हा राम गोपाल वर्मानं बनवला होता. मुख्य आरोपी अजमल कसाबच्या ट्रायलवर आधारित हा सिनेमा आहे, ज्याला पोलिसांनी जिवंत पकडलं होतं. हा सिनेमा 2013 साली रिलीज झाला होता. सिनेमात नाना पाटेकर लिड रोलमध्ये होते.

2) याव्यतिरिक्त असेही काही सिनेमे आहेत जे 26/11 च्या हल्ल्यावर आधारित नसले तरी त्यापासून प्रेरित आहेत. 2015 साली आलेला कबीर खानचा फँटम सिनेमाही असाच आहे. यात सैफ अली खान आणि कॅटरीना कैफनं मुख्य भूमिका साकारली होती.

3) मेजर – शहीद कमांडोवरील सिनेमा मेजर हा मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचं बायोपिक असून निर्माणाधीन आहे. साऊथ सुपरस्टार महेश बाबू हा सिनेमा प्रोड्युस करत आहेत. अदिवी शेष यात मेजर उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणार आहे. हिंदी आणि तेलगू भाषेत सिनेमा रिलीज केला जाणार आहे. यात सई मांजरेकर आणि शोभिता धूलिपाला हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

आंतरराष्ट्रीय सिनेमे –

1) हॉटेल मुंबई – 26/11 वर बनवलेला हॉटेल मुंबई हा ताजा सिनेमा आहे. हा सिनेमा गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला होता. हा सिनेमा ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारताचं को प्रॉडक्शन होता. हा सिनेमा 14 मार्च 2019 रोजी ऑस्ट्रेलिया आणि 22 मार्च 2019 रोजी अमेरिकेत रिलीज झाला होता. या सिनेमात अनुपम खेर सहित देव पटेल आणि इतर आंतरराष्ट्रीय कलाकारांनी काम केलं होतं. या एका शेफची स्टोरी होती जो आपल्या हॉटेलमधील गेस्टला वाचवतो.

2) ताज महाल – ताज महाल एक स्पॅनिश सिनेमा होता. 2015 साली आलेल्या या सिनेमाला निकोलस सादनं डायरेक्ट केलं होतं. परदेशी टुरिस्ट्स हॉटेलमध्ये अडकले यावर ही कहाणी होती. हा सिनेमा वेनिस फिल्म फेस्टिव्हलच्या 72 व्या एडिशनमध्ये दाखवला हाेता.

3) वन लेस गॉड – 2017 साली आलेला हा सिनेमा हॉटेल ताजमध्ये थांबलेल्या पर्यटकांवर बनवला गेला होता. लियाम वर्थिंगटन यानं सिनेमाचं डायरेक्शन केलं होतं. यात अनेक देशी आणि परदेशी कलाकार होते. हा सिनेमा 18 जानेवारी 2019 रोजी भारतात रिलीज करण्यात आला होता.

वेब सीरिज –

1) स्टेज ऑफ सीज 26/11 – झी 5 वरील 8 एपिसोडची ही सीरिज 26/11 च्या घटनेवर आधारित आहे. यात एनएसजी कमांडोची अ‍ॅक्शन आणि धाडस दाखवण्यात आलं आहे. यात अर्जुन बाजवा, अर्जुन बिजलानी, मुकुल देव, विवेक दहिया, तारा अलिशा बेरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

2) मुंबई डायरीज – निखिल अडवाणीनं या सीरिजची निर्मिती केली आहे. कामा हॉस्पिटलमधील हत्याकांडावर याचा फोकस आहे. यात कोंकणा सेन शर्मा आणि मोहित रैना प्रमुख भूमिकेत आहेत. आधी याचं टायटल बॉम्बे डायरीज होतं. अ‍ॅमेझॉन प्राईमवर ही सीरिज रिलीज होणार आहे.

You might also like