Bollywood Drugs Case : अभिनेत्री ‘टिया वाजपेयी’नं केली ड्रग टेस्ट, सोशल मीडियावर पोस्ट केला रिपोर्ट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बॉलिवूडमध्ये सध्या ड्रग्सचा मुद्दा चर्चेत आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना या संदर्भात विचारपूस केली जात आहे. शुक्रवारी रकुलप्रीत चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर झाली. त्याचबरोबर दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना 26 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. दीपिका आणि सारा गोव्यात होत्या. दोन्हीही बुधवारी मुंबईला पोहोचल्या. या दरम्यान अभिनेत्री टिया वाजपेयीने एक अनोखे पाऊल उचलले आहे. टियाने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला बदनामीपासून वाचवण्यासाठी तिची ड्रग टेस्ट करून घेतली आणि आपला अहवाल सार्वजनिक केला. तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि इतर लोकांना विनंती केली की ही चाचणी स्वेच्छेने करावी, जेणेकरुन संपूर्ण इंडस्ट्रीवर प्रश्नचिन्ह उभे राहू नये.

टियाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते की- सध्या करमणूक उद्योगाला बदनाम केले जात आहे, कारण निवडक काही जण ड्रग्सचे सेवन करतात. म्हणून मी माझी ड्रग टेस्ट केली आहे, जी निगेटिव्ह आली आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की सर्वांना एकाच रांगेत उभे करू नये. आमच्यामधील काही लोक गांभीर्याने आपले काम करतात आणि खरोखरच चांगल्यासाठी काम करीत असतात. मी माझ्या सर्व साथीदार कलाकारांना विनंती करते की त्यांनी त्यांची ड्रग टेस्ट करुन ती सार्वजनिक करावी. आपल्या कुटुंबासाठी, कामासाठी आणि चाहत्यांसाठी हे ट्विट करा.

टिया बाजपेयीने विक्रम भट्टच्या हॉन्टेड 3 डी चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हेट स्टोरी 4 मध्ये ती शेवटच्या वेळी पडद्यावर दिसली होती, ज्यात तिने एक छोटी भूमिका साकारली होती. टिया एक गायिका देखील आहे आणि अनेक गाण्यांना तिने आवाज दिला आहे. काही काळापूर्वी कंगना रणौतने देखील बॉलिवूड कलाकारांना असे करण्याची विनंती केली होती. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी रणबीर कपूर, विक्की कौशल, रणवीर सिंह आणि अयान मुखर्जी यांना ड्रग्ससाठी ब्लड टेस्ट करण्यास सांगितले होते.

सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या चौकशीच्या वेळी ड्रग्सचा मुद्दा समोर आला आणि त्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि काही पॅडलर्सना अटक केली. त्यानंतर, दररोज नवीन नावे उघडकीस येत आहेत. व्हाट्सअ‍ॅप ड्रग चॅटच्या माध्यमातून जसजशी नावे उघडकीस येत आहेत त्यानुसार एनसीबी चौकशीसाठी बोलवित आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like