राजामौलींच्या RRR सिनेमाच्या घोषणेनंतर बोनी कपूर यांनी व्यक्त केली नाराजी ! म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा सिनेमा बाहुबली (Baahubali) चे डायरेक्टर एस एस राजामौली (S. S. Rajamouli) त्यांचा मेगा बजेट प्रोजेक्ट RRR वर काम करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. चाहत्यांनाही आरआरआर सिनेमाबद्दल खूप उत्सुकता होती. आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी सोमवारी (दि 25 जानेवारी 2021) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, हा सिनेमा 13 ऑक्टोबर 2021 रोजी दसऱ्याच्या दोन दिवस आधी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. ही रिलीज डेट समोर आल्यानंतर आता प्रोड्युसर बोनी कपूर (Boney Kapoor) नाराज झाल्याचं दिसत आहे.

राजामौलींच्या सिनेमाची रिलीज डेट समोर आल्यानंतर आता बोनी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण बोनी कपूर प्रोड्युस्ड मैदान हा सिनेमा 15 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. पंरतु त्याच्या दोन दिवस आधीच आरआरआर रिलीज होणार आहे. याचा त्यांच्या सिनेमाच्या कमाईवर परिणाम होणार आहे.

एका मुलाखतीत बोलताना बोनी कपूर म्हणाले, मी खूप जास्त अपसेट आहे. कारण मैदान सिनेमाची रिलीज डेट 6 महिन्यांपूर्वीच घोषित करण्यात आली आहे. अशा वेळी आपण एकत्र येत इंडस्ट्रीला वाचवण्याची गरज आहे. परंतु राजामौलींनी काहीच डिस्कस केलं नाही आणि ही घोषणा केली असंही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.