Video : अभिनेता अक्षय कुमारनं बॉटल कॅप चॅलेंज स्विकारलं, व्हिडीओ पाहून व्हाल थक्‍क

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर बॉटल कॅप चॅलेंज मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या चॅलेंज मध्ये एका व्यक्तीला गोल फिरता फिरता समोर असलेल्या बॉटलचे झाकण काढायचे ते ही बॉटल काही पडू न देता. सोशल मीडियावर लोक एकमेकांना हे चॅलेंज देत आहेत. हॉलिवूड सोबतच आता बॉलिवूड मध्ये अक्षय कुमारने हा चॅलेंज स्वीकारला असून त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडियो शेअर करत अक्षय ने लिहिले आहे की, – “मी स्वतःला या बॉटल कॅप चॅलेंज पासून थांबवू शकलो नाही. मी माझ्या आयडियल पासून इंस्पायर झालो आहे. मला चांगली वाटलेली माहिती मी रिपोस्ट आणि रिट्विट करतो. तर मुली आणि मुलांनो या आणि बॉटल कॅप चॅलेंज स्वीकार”

अक्षयने हा स्टंट जेसन स्टेथन यांच्या कडून इंस्पायर होऊन केला आहे. काही दिवसा आधी जेसन स्टेथम यांनी हा चॅलेंज करत असतानाच व्हिडीओ शेअर केला होता. जेसन स्टेथम यांना हा चॅलेंज युरॉलसन हग यांनी दिला होता आणो तो त्यांनी पूर्ण केला. टाइगर श्रॉफ आणि विद्युत जामवाललाही हा चॅलेंज देण्यात आला आहे. आता हे पाहण्यात मजा असणार आहे कि कोण किती लवकर हा चॅलेंज स्विकारतो आणि पूर्णही करतो.

अक्षय कुमारचा हा व्हिडियो त्यांच्या चाहत्याला खूप आवडला आहे. त्याच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर खूप सारे कमेंट टाकले आहे. एका तासात या व्हिडियोला १२ लाखहून अधिक लोकांनी पसंद केली आहे.

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल

बनावट कागदपत्रांच्या आधारे जातीचा दाखला घेऊन फसवणूक

न्यायाधीशांच पंतप्रधानांना पत्र, न्यायव्यवस्थेत घराणेशाही आणि जातीवाद