साऊथ इंडियन ॲक्टर ‘विजय’च्या ‘मास्टर’ सिनेमानं रचला इतिहास ! एकाच आठवड्यात केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजय (Vijay) आणि विजय सेथुपती (Vijay Sethupathi) यांचा मास्टर (Master) हा सिनेमा 13 जानेवारी 2020 रोजी सिनेमाहॉलमध्ये रिलीज झाला. एकाच आठवड्यात सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. लोकांना हा सिनेमा एवढा आडवत आहे की, कोरोनाचं संकट असूनही लोक थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पहात आहेत.

आंध्रा बॉक्स ऑफिस सिनेमाच्या एका आठवड्याची कमाई सांगत ट्विट केलं आहे. यानुसार या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात फक्त तमिळनाडूतच 100 कोटींची कमाई केली आहे. या सोबत सिनेमानं एक इतिहासही रचला आहे. आज पर्यंत सुपरस्टार रजनीकांत यांच्याव्यतिरीक्त इतर कोणत्याच स्टारनं ही अचीव्हमेंट मिळवली नव्हती. परंतु विजयनं मात्र करून दाखवलं. असाही अंदाज लावला जात आहे की, येणाऱ्या दिवसात हा सिनेमा आणखी बिजनेस करू शकतो.

मास्टर हा एक तमिळ सिनेमा आहे. हा सिनेमा तेलगू सोबतच हिंदी भाषेतही रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा जबरदस्त असल्याचं अनेकांनी सोशलवर म्हटलं आहे. विजयच्या दमदार अभिनयाचंही खूप कौतुक होताना दिसत आहे. या सिनेमा भरपूर ॲक्शन दिसत आहे. याची स्टोरीही प्रेक्षकांना आवडल्याचं सांगितलं जात आहे.