Birthday SPL : जान्हवीच्या अभिनेत्री होण्याशी आई श्रीदेवी सहमत नव्हती, अपूर्ण राहिली ‘ही’ ईच्छा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची चांदनी श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आज आपला 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रीदेवीशिवाय साजरा केला जाणारा जान्हवीचा हा तिसरा वाढदिवस आहे. पिता बोनी कपूर आणि खुशी कपूर प्रत्येक पावलावर तिला साथ देतात. परंतु आईची कमी तिला आजही खटकते.

जान्हवी कपूरला लहानपणापासूनच अ‍ॅक्ट्रेस व्हायचं होतं. परंतु श्रीदेवीची अजिबात इच्छा नव्हती की, जान्हवीनं अ‍ॅक्ट्रेस बनावं. श्रीदेवीनं आपल्या मॉम या सिनेमाच्या प्रमोशनल इंटरव्ह्युमध्ये याबाबत खुलासा केला होता. श्रीदेवी म्हणाली, “जान्हवीला सिनेमात काम करायचं होतं. परंतु सुरुवातीला मी तिच्या या गोष्टीसाटी सहमत नव्हते. मला इंडस्ट्रीला वाईट नाही म्हणायचं. मी याच दुनियेची बनली आहे. एक पॅरेंट म्हणून तिला विवाहित पाहण्यात मला जास्त आनंद वाटेल.”

पुढे ती म्हणाली होती की, “तिच्या आनंदातच माझा आनंद आहे. जर ती अ‍ॅक्ट्रेस म्हणून चांगलं काम करत असेल तर मला तिचा अभिमान वाटेल.”

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. याशिवाय ती रुही आफ्जा या रोमँटीक हॉरर सिनेमातही दिसेल. इतकेच नाही तर तर गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलल्या गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही ती काम करणार आहे. याशिवाय तिच्याकडे तख्त हा सिनेमादेखील आहे.

https://www.instagram.com/p/B8S3pJPAKNx/