Coronavirus Impact : ‘कान्स फिल्म फेस्टीवल 2020’ रद्द होणार ? प्रेसिडेंट म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसला आता महामारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 29 मार्च रोजी सुरू होणारा IPL चा 13 वा सीजनही कोरोनामुळं कॅन्सल करण्यात आला आहे. अनेक इव्हेंट आणि सिनेमाच्या शुटींग्सही रद्द होताना दिसत आहेत. सिनेमांच्या रिलीज डेटही बदलण्यात येत आहेत. आता अशीही माहिती समजत आहे की, कान्स फिल्म फेस्टीवल 2020 देखील रद्द होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर हा फेस्टीवल कॅन्सल केला जाईल.

कान्स फिल्म फेस्टीवलचे प्रेसिडेंट पियेर लेस्क्योर ( Pierre Lescure) यांचं म्हणणं आहे की, “आम्हाला आशा आहे की, मार्चच्या अखेरपर्यंत ही महामारी (कोरोना) संपुष्टात येईल. एप्रिलमध्ये परिस्थिती सुधारेल. जर परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही हा इव्हेंट कॅन्सल करू” असंही ते म्हणाले. कान्स फिल्म फेस्टीवलचा 73 वा सीजन 12 ते 13 मे 2020 दरम्यान होणार आहे.

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, कॅटरीना कैफ स्टारर सूर्यवंशी या सिनेमाची रिलीज डेट पुढील माहिती मिळेपर्यंत टाळण्यात आली आहे. कोरोना व्हायरसची वाढती दहशत पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहून बॉलिवूड इंडस्ट्रीही आता सतर्क झाली आहे. कार्तक आर्यन कियारा आडवाणी यांचा सिनेमा भूल भलैया 2 ची शुटींगही थांबवण्यात आली आहे. राज्यातलील काही शहरातील शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.

https://www.instagram.com/p/B4umDjVhbJv/

https://www.instagram.com/p/B4sDhoXhpIo/