वादात सापडला ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट, गंगूबाईच्या कुटूंबाने संजय भन्साळी-आलियावर दाखल केला खटला
नवी दिल्लीः वृत्तसंस्था – संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट वादात सापडला आहे. वास्तविक, गंगूबाईच्या कुटुंबीयांनी संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्याविरूद्ध मुंबई शहर सिव्हिल न्यायालयात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात गंगूबाईच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन जैदी नावाच्या व्यक्तीने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्याविरुद्ध 22 डिसेंबर रोजी खटला दाखल केला आहे. या तिन्ही सेलिब्रिटींना 7 जानेवारी 2021 पर्यंत उत्तर देण्यास मुदत देण्यात आली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर बनत आहे. चित्रपटाचे शूटिंगही सतत सुरू आहे. दरम्यान, या नवीन वादामुळे निर्मात्यांना अडचणी येऊ शकतात.
गंगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियांचे मोठे नाव होते. असं म्हणतात की, त्यांना पतीने अवघ्या पाचशे रुपयात विकले होते. तेव्हापासून त्या वेश्या व्यवसायात गेल्या. यावेळी त्यांनी मुलींसाठी बरीच कामेही केली. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यात आलिया एका गॅंगस्टरची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री पहिल्यांदाच अशी व्यक्तिरेखा साकारणार आहे. याआधी तिने गल्ली बॉयमध्ये थोडेसे आक्रमक पात्र साकारले होते. त्याचबरोबर आलिया संजय लीला भन्साळीसोबत पहिल्यांदाच एका चित्रपटात काम करत आहे.
या चित्रपटात अजय देवगणचा कॅमियो देखील दिसणार आहे. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये सेट करण्यात आला आहे. एक भाग विभाजनपूर्व आहे, तर दुसरा भाग आठव्या दशकात तयार झाला आहे.