बॉलीवूड मधील ‘कास्टिंग’ डायरेक्टर चालवत होता ‘सेक्स रॅकेट’, चौकशीत खळबळजनक ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोरेगाव येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी दोन अभिनेत्रींना अटक केल्यानंतर एका दिग्दर्शकालाही अटक करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टरला अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मेकअप आर्टिस्ट आणि एका ज्यूनिअर कलाकाराची सुटका केली आहे. वर्सोवा येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या सामाजिक विभागाने मंगळवारी नवीन प्रेमलाल आर्य (वय-32) यास अटक केली. एका कॉफी शॉपमध्ये पीडितेचा 60 हजार रुपयांमध्ये सौदा करताना पोलिसांनी त्याला अटक केली. यावेळी आरोपीने या रॅकेटसंबंधी माहिती दिली. हे सेक्स रॅकेट मागील काही दिवसांपासून राजरोसपणे सुरु असून यात काही मॉडेल आणि बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे.

एका हिंदी वृत्तवाहीनीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ज्या दोन मुलींची सुटका केली त्या मूळच्या पश्चिम बंगालच्या आहेत. दिल्लीतील अश्विनी कुमार नावाच्या एका व्यक्तीने त्यांना मुंबईत पाठवले होते. या प्रकरणी आर्य असोसिएटचे लोकही आरोपी असल्याचे मुंबई पोलिसांच्या सामाजिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी संदेश येवले यांनी सांगितले. याप्रकरणी मानव तस्करी विरोधी कायाद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/