बॉलिवूडला आणखी एक ‘धक्का’ ! कास्टींग डायरेक्टर क्रिश कपूरचं 28 व्या वर्षी निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडसाठी 2020 अशा काही जखमा देत आहे ज्यांचा कधीच विसर पडू शकणार. इंडस्ट्रीतून अनेक वाईट बातम्या समोर येत आहेत ज्या थांबायचं नाव घेत नाहीये. कास्टींग डायरेक्टर क्रिश कपूर यानंही खूपच कमी वयात(28 वर्षे) जगाचा निरोप घेतला आहे. आधी अशी माहिती समोर आली होती की, रस्ता अपघातात त्याचं निधन झालं आहे. परंतु आता क्रिशच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे की, ब्रेम हॅमरेजमुळं त्याचं निधन झालं आहे.

क्रिश कपूर विवाहित असून त्याच्या कुटुंबात आता त्याच्यानंतर त्याची आई, पत्नी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे. क्रिशचे मामा सुनील भल्ला यांनी सांगितलं की, क्रिश घरीच बेशुध्द झाला होता. त्याची कोणतीही मेडिकल हिस्ट्री नव्हती. तो एकदम निरोगी होता. 31 मे 2020 रोजी अचानक तो बुशुद्ध झाला आणि त्याच्या शरीरातून रक्त येऊ लागलं. यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ब्रेम हॅमेरजमुळं त्याचा मृत्यू झाला.

क्रिशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कास्टींग डायरेक्टर क्रिश कपूरनं महेश भटचा सिनेमा जलेबी आणि कृती खरबंदा अभिनीत वीरे दी वेडिंग अशा सनेमांसाठी कास्टींग डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. त्यानं शुभ रात्रि ही वेबी आणि इतरही काही प्रोजेक्ट्ससाठी काम केलं आहे.