‘रामायण’वाल्या ‘त्या’ डायलॉगमुळे ऋतिकचा ‘सुपर ३०’ अडचणीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता ऋतिक रोशनचा चित्रपट ‘सुपर ३०’ ला सेन्सॉर बोर्डने ‘U’ सर्टिफिकेट देऊन हिरवा सिग्नल दिला आहे पण यासोबतच चित्रपटामध्ये बदल करण्याचा देखील सल्ला दिला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त दोन दिवस राहिले आहे. सेन्सॉर बोर्डने काही सूचना दिल्या आहेत त्यांनी मेकर्सला चित्रपटामधून रामायणाचा उल्लेख काढण्यासाठी सांगितले आहे.

सेन्सॉर बोर्डच्या निर्देशांशी संबंधित माहिती त्यांच्या वेबसाइटवर दिली आहे. यानुसार, ‘रामायण’ शब्दाला ‘राज पुरुम’ पासून रिप्लेस करण्यासाठी बोलले गेले आहे. या व्यतिरिक्त चित्रपटामधून या सीन ला काढून टाकण्यास सांगितले आहे. ज्यामध्ये एका मंत्रीने बार डान्सरच्या पोटाला हात लावलेले सीनमध्ये दाखविले आहे. यासोबतच मेकर्सला निर्देश दिले आहे की, सॉंगच्या दरम्यान एक एंटी लिकर डिसक्लेमर दाखविले जावे.

हा चित्रपट गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये दाखविले जाणार आहे की, कशाप्रकारे ते एक कोचिंग सेंटरचा स्टार टिचर बनने सोडून मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतात. यामध्ये ते पैसे आणि पोजीशनला देखील नाकारतात. आनंद कुमार हे दरवर्षी ३० मुलांची निवड करतात. त्यांना शिक्षण देतात आणि महत्वाचे हे आहे की, आनंद हे मुलांकडून फी घेत नाही. याउलट त्याच्या खाण्यापिण्याचा खर्चसुद्धा करतात. अशा प्रेरणादायी कहानीला आत्तापर्यंत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याला पाहून असे वाटते की, ऋतिकचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करेल.

 

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?