सर्वात महागड्या अभिनेत्रीच्या घरावर ‘इन्कम टॅक्स’ विभागाचा छापा, अनेक सुपरस्टारसोबत केलंय काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील बर्‍याच चित्रपटांमधील आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. रश्मिका मंदाना ही दक्षिण सिनेमाची सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती कर्नाटकातील कोडुगु जिल्ह्यातील विराजपेत येथील रहिवासी असून तिच्या घरावर आयकर विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम गुरुवारी सकाळी ७.३० वाजता रश्मिका मंदानाच्या घरी पोहोचली. दरम्यान, त्या वेळी रश्मिका घरात होती की नाही याची माहिती नाही. दरम्यान, आतापर्यंत या अभिनेत्री किंवा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांपैकी कोणीही छापेबाबत अधिकृत निवेदन दिले नाही.

दरम्यान, रश्मिका मंदाना ही दक्षिण सिनेमाची सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक सुपरस्टार कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र, जेव्हा रश्मिकाला तिच्या शुल्काबाबत विचारण्यात आले, तेव्हा तिने या गोष्टीचे खंडन केले. ती म्हणाली की, ‘मी सध्या चित्रपटात बेबी स्टेप टाकत आहे, त्यामुळे मी सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री अजिबात नाही’.

एका मुलाखतीत रश्मिका म्हणाली, ‘जेव्हा लोक म्हणतात की मी चित्रपटासाठी सर्वाधिक पैसे घेते, तेव्हा मला आश्चर्य वाटते, ही बातमी कुठून पसरत आहे हे मला ठाऊक नाही. माझ्याकडे बँकेत पैसे नाही. मी अजूनही या क्षेत्रात नवीन आहे.’ दरम्यान रश्मिकाने आपल्या चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात कन्नड चित्रपट किरीक पार्टीपासून केली होती. यानंतर तिने अनेक चमकदार चित्रपटांमध्ये काम केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like