कोरोनाच्या भीतीनं प्रमोशनसाठी दिल्लीला जाणं टाळत आहेत ‘स्टार्स’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसची दहशत सामान्य माणसांसोबतच आता सेलिब्रेटींपर्यंतही पोहोचली आहे. अलीकडे अनेक सेलिब्रेटी मास्क लावून फिरताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी आपले दौरे आणि शुटींग रद्द किंवा पोस्टपॉन केले आहेत. सलमान खाननंही राधे सिनेमाची शुटींग रद्द केली. यानंतर अनेक मोठ्या फिल्म मेकर्सनीही आपली शुटींग रद्द केली. या वातावरणामुळं बलिवूडचं कोट्यावधीच नुकसान होणार आहे असं दिसत आहे.

कृती सेनन आणि राजकुमार रावच्या सिनेमावर सकंट

दिल्लीत कोरोना व्हायरसचा प्रकोप पाहता अनेक कलाकार आणि फिल्म मेकर्स दिल्लीला जाणं टाळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार राव, कृती सेनन, डिंपल कपाडिया आणि परेश रावल स्टारर एका सिनेमाची शुटींग 15 मार्च पासून दिल्लीत होणार होती. परंतु कोरनाच्या भीतीनं आता प्रॉडक्शन हाऊस ही शुटींग रद्द करण्याचा विचार करत आहे. त्यांच्यासाठी कास्ट अँड क्रूची हेल्थ जास्त महत्त्वाची आहे. या सिनेमाचं टेंटिटीव टायटल शर्तें लागू आणि सेकंड इनिंग ठेवण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसची वाढती दहशत पाहता आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयफा अवॉर्ड्स 2020 या महिन्याच्या शेवटी इंदोरमध्ये होणार होता.

टीव्ही आणि प्रोशन्सवरही परिणाम
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बागी 3 आणि अंग्रेजी मीडियमनं कोरोनापासून दूर राहण्यासाठी अनेक शहारतील आपले प्रमोशनल इव्हेंट्स रद्द केले आहेत. मुंबईत अद्याप कोरोना पसरलेला नाही. तरीही अशी माहिती समजत आहे की, मुंबईतील होळीच्या फिल्मी पार्ट्याही रद्द केल्या जाऊ शकतात. अनेक कलाकारांनी आपले परदेश दौरे रद्द केले आहेत.

कोरोनानं रोखली सयामीची दौड
मिर्जिया फेम सयामी खेर च्या नागार्जुन स्टारर वाईल्ड डॉगची शुटींग थायलंडला होणार होती. कोरोनाच्या भीतीनंच ही शुटींग रद्द करण्यात आली होती. नेदरलँडमध्ये होणारी तिची मॅरथॉनही सयामीला रद्द करावी लागली आहे.