‘संजय दत्त – माधुरी दीक्षित’सह ‘या’ 6 बॉलिवूडच्या सुपरस्टारची ‘प्रेम’ कहाणी अर्धवटच राहिली, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री खूपच कमाल होती. अशा जोड्या ज्यांची लोकं उदाहरणं देत होती परंतु त्या जोड्या आपलं नातं शेवटापर्यंत नेऊ शकल्या नाहीत. आज अशाच काही जोड्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्या अधुऱ्या राहिल्या आणि अमर झाल्या आहेत.

1) अमिताभ बच्चन- रेखा– बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी आजही प्रेक्षकांना खूप आवडते. परंतु आता मात्र ते एकत्र काम करताना दिसणं शक्य नाही. कारण आता दोघांचे रस्ते वेगळे झाले आहेत. अमिताभ आणि रेखा यांच्यातील प्रेमाचा सिलसिला हा सिलसिला मुव्हीपासूनच सुरू झाला होता. परंतु अमिताभनं जया बच्चनसोबत लग्न केलं आणि रेखा सोबतचं त्यांचं नात अधुरं राहिलं.

2) राज कपूर – नरगिस- राज कपूर आणि नरगिस यांनी ऑनस्क्रीन केमिस्ट्री जेवढी सुंदर होती तेवढीच ऑफस्क्रिन केमिस्ट्रीही छान होती. दोघांचं प्रेम खऱ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकलं नाही. याचं कारण म्हणजे राज कपूर विवाहित होते. यानंतर मदर इंडिया सिनेमावेळी नरगिस सुनील दत्तच्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न केलं. सिनेमात नरगिसनं सुनीच्या आईची भूमिका साकारली होती ही गोष्ट वेगळी.

3) गुरू दत्त- वहिदा रहमान- अ‍ॅक्टर गुरू दत्त आणि वहिदा रहमान यांच्या प्रेमाची स्टोरी खूपच ट्रॅजिक आहे. गैरसमजामुळे या नात्याचा अंत झाला. दोघंही एकमेकांसाठी पागल झाले होते. परंतु त्या दरम्यानच्या काळात अशा काही घटना घडल्या की नात्यात कटुता आली आणि दोघांच्या नात्याचा शेवट झाला.

4) सलमान खान-ऐश्वर्या रॉय बच्चन– सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांचं नाव या यादीत ट्रेंडिंग आहे. संजय लीला भन्साळी यांच्या हम दिल दे चुके सनम या सिनेमाच्या वेळी सलमान आणि ऐश्वर्या यांची जवळीकता वाढली. परंतु हे नातं जास्त काळ टिकलं नाही. ऐश्वर्यानं त्याच्यावर आरोप केले होते की तो दारू पिऊन तिच्या सोबत गैरवर्तण करतो. तिनं सांगितलं होतं तो हातही उचलतो. यानंतर विवेक ओबेरॉयनं पत्रकार परिषद घेतली होती. यानंतर गोष्टी अजून बिघडल्या होत्या. नंतर दोघांमधील दुरावा वाढत गेला.

5) संजय दत्त- माधुरी दीक्षित– एक असा काळ होता जेव्हा संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेरच्या चर्चांनी जोर धरला होता. परंतु संजय दत्तची पर्सनल लाईफ या नात्यात आडवी आली. संजय दत्तचं आधी लग्न झालेलं होतं त्याला एक मुलगीही होती. त्यामुळे माधुरीनं या लग्नासाठी कधी होकार दिला नाही आणि दोघांची प्रेमकहाणी अधुरी राहिली.

6) सनी देओल- डिंपल कपाडिया- सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांची प्रेमकहाणीही निराळीच आहे. दोघांची जोडी ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन खूप हिट होती. परंतु सनी देओल विवाहित असल्यानं हे नातं पुढे जाऊ शकलं नाही.